मनमाड: राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत असतानाच, उत्तर महाराष्ट्रातील मनमाड - मुंबई दरम्यान धावणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसमधील २८ वर्षांची रेल्वे गणेश वारीची परंपरा यंदा खंडित झाली आहे. यामुळे हजारो गणेशभक्त, चाकरमानी, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.