Crime Alert : सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain Snatchers

Crime Alert : सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ

नाशिक : शहरात शनिवारी (ता. १४) सोनसाखळी चोरट्यांनी (Gold Chain Snatchers) धुमाकूळ घालत तीन ठिकाणाहून सोनसाखळ्या ओरबाडून नेल्या. त्यामुळे या सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे तगडे आव्हान पोलिस आयुक्त आणि दलापुढे उभे आहे. सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने शहरात पोलिसांकडून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली जात असताना शहरातून शनिवारी तीन सोनसाखळी चोरीला गेल्याने नाकाबंदी ‘फेल’ झाल्याचे चित्र तयार झाले आहे. (Gold chain thieves rampant in the city Nashik Crime News)

रथच्रक चौक येथे राहत असलेल्या वनलता पारकर (वय ८४) शनिवारी सकाळी नऊला घराबाहेर उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ येत गळ्यातून दोन तोळे वजनाची सोन्याची पोत ओरबाडून नेली. त्यानंतर जान्हवी अमीन या (६२) सकाळी साडेनऊला बागेत फुले तोडत असताना त्यांनादेखील सोनसाखळी चोरट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत सोन्याची पोत ओरबाडून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिसरी घटना म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ रोड भागात घडली. चिंतामण काळे (७१) हे घराजवळ उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओरबाडून नेली.

हेही वाचा: Nashik : बंदीजनांसाठी २० मे पासून अभंग, भजन गायन स्पर्धा

ज्येष्ठ नागरिक रडारवर
शहरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये खासकरून ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातून सोनसाखळी ओरबाडून नेण्याच्या घटना अधिक आहे. यासह विवाह सोहळ्यानिमित्त बाहेरगावाहून आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवरदेखील चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. मागील चार दिवसांमध्ये औरंगाबाद रोड व रासबिहारी लिंक रोडवर असलेल्या लॉन्ससमोर दोन घटना घडल्या आहेत.

हेही वाचा: Crime Alert : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Web Title: Gold Chain Thieves Rampant In The City Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top