
Crime Alert : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण
नामपूर (जि.नाशिक) : येथील इंदिरानगर परिसरातील रहिवासी व नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor girl) नामपूर शहरातीलच एका तरुणाने फूस लावून चाकूचा धाक दाखवत पळवून (Kidnapping) नेल्याची घटना मंगळवारी (ता. १०) घडली. गेल्या चार दिवसांपासून संशयित तरुण जायखेडा पोलिसांना सापडत नसल्याने विधवा आईचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत मुलीची आई कल्पना सोनवणे (वय ३८) यांनी जायखेडा पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. (Kidnapping of a minor girl at gunpoint Nashik Crime News)
इंदिरानगर येथील कल्पना सोनवणे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दशु आणि अनुष्का अशा दोन मुली आहेत. मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी नामपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कामगार म्हणून त्या काम करतात. १० मेस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आपली मुलगी दशुला कामासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविले. त्यानंतर तेथील काम आटोपल्यानंतर शिवमनगर येथील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून तिला पळवून नेल्याचे कल्पना सोनवणे यांनी सकाळला सांगितले. यानंतर आपल्या मुलीचा शोध लागावा, यासाठी त्यांनी तातडीने जायखेडा पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा: Nashik : उन्हाळाच्या सुट्टीमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी
गेल्या चार दिवसांपासून आपल्या काळजाचा तुकडा दिसत नसल्याने आईचा जीव कासावीस झाला आहे. दशूची उंची ५ फूट २ इंच असून, तिचा रंग गोरा आहे. शरीराने मध्यम असलेल्या दशूने निळी जीन्स, काळा टीशर्ट घातला असून, उजव्या डोळ्याच्या खाली बारीक निशाणी आहे. पायात चप्पल घातल्याचे वर्णन फिर्यादीत करण्यात आले आहे. अशा वर्णनाची मुलगी कुठे दिसल्यास जायखेडा पोलिसांशी तातडीने संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी याकामी तातडीने तपासाची सूत्रे फिरवून गोरगरीब कुटुंबातील मातेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा: 40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी 3 महिन्याचा अल्टिमेटम
Web Title: Kidnapping Of A Minor Girl At Gunpoint Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..