esakal | काय सांगता..! सोने प्रतितोळ्याचा 'भाव' कळला का?भविष्यातही भाव वाढण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

gold 123.jpg

सकाळ वृत्तसेवा
भारतात वायदे बाजारात सोमवारी (ता. 29) सोन्याने मोठी उसळी घेऊन अर्धशतकी टप्पा पार करत आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे नाशिकच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा जीएसटीसह 50 हजार 700 पर्यंत पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक हजार 770 डॉलर इतकी वाढ नोंदवली गेली. तसेच भारतीय रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि भारत-चीन वाढलेला संघर्ष या कारणाने देखील भारतामध्ये वायदे बाजारात तेजी बघायला मिळत आहे.

काय सांगता..! सोने प्रतितोळ्याचा 'भाव' कळला का?भविष्यातही भाव वाढण्याची शक्यता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : भारतात वायदे बाजारात सोमवारी (ता. 29) सोन्याने मोठी उसळी घेऊन अर्धशतकी टप्पा पार करत आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे नाशिकच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा जीएसटीसह 50 हजार 700 पर्यंत पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक हजार 770 डॉलर इतकी वाढ नोंदवली गेली. तसेच भारतीय रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि भारत-चीन वाढलेला संघर्ष या कारणाने देखील भारतामध्ये वायदे बाजारात तेजी बघायला मिळत आहे.

सोन्यातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढतेय
गेल्या वर्षापासून सोन्याच्या भावात सातत्याने मोठी वाढ झालेली आहे. भारतातील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याने सोन्यातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. भविष्यात देखील सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळण्याची शक्‍यता आहे. कारण सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे बॅंकाचे ठेवींवरील व्याजदर कमी होत असल्याचे चित्र आहे.

गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राध्यान्य

गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राध्यान्य देत आहेत. तसेच अनेक लग्नसमारंभ, इतर सोहळे हे थोडक्‍यात होत असल्याकारणाने त्यातील खर्च वाचल्याने त्यातून सोने खरेदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. संकटसमयी सोन्यातील गुंतवणूक उपयोगी पडते, हे देखील सोन्यावरील विश्‍वासाचे एक कारण आहे.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

तज्ज्ञांनी सोन्यामध्ये भाववाढीचा अंदाज वर्तविला
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिश्‍चितता व भारत-चीन यांच्यात वाढत चाललेला तणाव यामुळे तज्ज्ञांनी सोन्यामध्ये भाववाढीचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे कल वाढला आहे. तसेच लग्नसमारंभ व इतर सोहळे, पर्यटन यावरील खर्च वाचत असल्याने त्यातून सोने खरेदीला पसंती दिली जात आहे.- चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

गेल्या सहा महिन्यांतील सोन्याचे दर
महिना प्रतितोळा दर
जानेवारी 42 हजार 800
फेब्रुवारी 43 हजार 500
मार्च 43 हजार 800
एप्रिल 47 हजार 400
मे 48 हजार 600
जून 50 हजार 700

loading image