Nashik Agro Tourism: जिल्ह्यात कृषी पर्यटनाला ‘अच्छे दिन’!

Nashik Agro Tourism
Nashik Agro Tourismesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Agro Tourism : धार्मिक पर्यटनाला सर्वाधिक महत्त्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात ॲग्रो टुरिझम अर्थात, कृषी पर्यटनाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. देश-विदेशातील पर्यटकांना जिल्ह्यातील २७ ठिकाणी नाशिकच्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते.

कृषी पर्यटन केंद्रांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य मिळत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यात सहभागी करून घेण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (Good day for agriculture tourism in nashik district)

देश-विदेशातील पर्यटक नाशिकच्या निसर्गसंपदेच्या प्रेमात आहेत. पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि कडक उन्हाळ्यात थंड हवेची अनुभूती नाशिकच्या वातावरणात मिळते. पर्यटकांना नाशिकची ओळख करून देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

जिल्ह्यात कृषी पर्यटनाची एकूण २७ केंद्रे असून, अहमदनगरमध्ये नऊ, तर धुळ्यात दोन केंद्रे आहेत. त्यांच्यामार्फत पर्यटक व स्थानिकांना सहल घडवली जाते. यात खाद्यसंस्कृती, वाइन, मिसळचा आस्वाद घेतात.

कृषी पर्यटन केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा सक्षम पर्याय मिळाला आहे.

जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन सुरू केले आहे. इतरही तालुक्यांतील शेतकऱ्यांना यात सहभागी करून घेण्यासाठी पर्यटन विभाग आता प्रयत्न करत आहे.

"कृषी पर्यटनाला जिल्ह्यात प्रचंड वाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळायला हवे. कृषी पर्यटन केंद्रांना शासनाच्या विविध योजनांमध्ये प्राधान्यक्रमही मिळतो."

- मधुमती सरदेसाई, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Agro Tourism
YCMOU News: ‘मुक्त’मध्ये प्रवेशार्थींना ABC नोंदणी सक्‍तीची! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत निर्णय

केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रे

- किमान एक एकर शेती

- सातबारा उतारा व ८ अ नोंद

- आधारकार्ड, पॅनकार्ड, वीजबिल

- २५०० रुपये नोंदणी शुल्कपावती

- फूड लायसन्स

तालुकानिहाय पर्यटन स्थळांची संख्या

नाशिक-१२

देवळा-२

त्र्यंबकेश्वर-३

इगतपुरी-५

दिंडोरी-४

निफाड-१

Nashik Agro Tourism
Nashik Leopard News: ‘बिबट्या आला रे आला’! अफवा पसरविणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल; वन विभागाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com