नाशिक : ऑक्सिजन टाक्यांमधील ठणठणाट होणार दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oxigen tank
नाशिक : ऑक्सिजन टाक्यांमधील ठणठणाट दूर

नाशिक : ऑक्सिजन टाक्यांमधील ठणठणाट होणार दूर

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची(nashik corona update) संख्या गुणाकाराच्या रूपाने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजन टाक्यांमधील (oxgyen tank)ठणठणाट दूर करण्यासाठी महापालिकेने(nashik carporation) जाधव ट्रेडर्सला काम दिले आहे. तायो निप्पॉन कंपनीने ३९ रुपये असा दर दिल्याने कमी दराने काम दिल्याचा दावा वैद्यकीय विभागाकडून केला जात असला तरी कमी किमतीत काम करण्यास नकार दिल्याने नाशिकस्थित जाधव ट्रेडर्सला ऑक्सिजन भरण्याचे काम मिळाले आहे. दरम्यान डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयातील(dr. zakir hussain hospital) पाच टाक्यांमध्ये ११७ मेट्रीक टन ऑक्सिजनचा बफर स्टॉक करण्यात आला असून गरज भासल्यास खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्याची महापालिकेची तयारी आहे.

हेही वाचा: अहमदनगर : गिते यांच्या व्यसनमुक्तीच्या कामाची थोरातांकडून दखल

शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णवाढीचा वेग बघता या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तिसऱ्या लाटेची घंटा वाजल्याने महापालिका प्रशासनाने तयारी करताना साडेबारा हजार बेडची उपलब्धता केली आहे. परंतु, सुदैवाने रुग्ण भरतीचे प्रमाण अवघे सात टक्के असल्याने तूर्त सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची तूट निर्माण झाली होती.

त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करताना याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून प्रतिदिन ४०७ मेट्रिक टनापर्यंत सज्ज ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असताना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील(dr. zakir hussain hospital) ऑक्सिजन टाक्यांमध्ये ठणठणाट असल्याची बाब समोर आली होती. त्यात ऑक्सिजन दराच्या पुरवठ्यावरून वाद असल्याचे बोलले जात होते. दुसऱ्या लाटेत तायो निप्पॉन कंपनीला ऑक्सिजन पुरवठ्याचे काम देताना सतरा रुपये प्रतिलिटर असा दर निश्‍चित करण्यात आला होता. तिसऱ्या लाटेत तायो ने ३९ रुपये प्रतिलिटर दर महापलिकेला दिला. जाधव ट्रेडर्सने १७ रुपये प्रतिलिटर दरात ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी घेतल्याने त्यांना काम देण्यात आले. सोमवारी (ता. १०) आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत जाधव ट्रेडर्स या कंपनीकडून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील पाच टाक्यांमध्ये ११७ मेट्रिक ऑक्सिजन भरण्यात आला.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात ११ हजार ८८६ शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत समावेश

खासगी रुग्णालयांना पुरवठा

महापालिकेने प्रतिदिन ४०७ मेट्रीक टन क्षमतेचे नियोजन केले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची(oxgyen) गरज भासणार नाही. जवळपास २४६ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्‍यकता भासेल, असा अंदाज आहे. मात्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास तुटवडा निर्माण होवू नये म्हणून ४०७ मेट्रिक टन ऑक्सिजन सज्ज ठेवला जाणार आहे. त्यासाठी तीन हजार सिलिंडर(three thousand oxgyen cyilinders) महापालिकेने(nashik carporation) घेतले असून त्यातील दीड हजार ऑक्सिजन सिलिंडर कोविड सेंटर तर आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये दीड हजार सिलिंडर खासगी रुग्णालयांना पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top