esakal | ''गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या'' - तालुका कृषि अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Gopinath-Munde-Farmers-Accident-Insurance-Scheme

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या - कृषि अधिकारी

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. ज्या शेतकऱ्यांच्या व कुटूंबाचे नावे उतारा आहे. त्यांचे किंवा कुटूंबातील एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटूंबाला दोन लाख रुपये तसेच शरीराचा एक अवयव निकामी झाल्यास त्या शेतकऱ्यास एक लाख रुपये शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले आहे.

पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्विकारले जाणार

यासाठी शासनाकडून विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. मात्र, १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या कालावधीत विमा कंपनी नियुक्ती केली नाही. तसेच, कुठल्याही प्रकारचे प्रस्ताव स्विकारण्यात आले नाहीत. कृषी विभागामार्फत या खंडीत कालावधीतील पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : बाप्पाच्या सजावटीसाठी ग्राहकांचा स्वदेशीचा नारा

ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या कालावधीत रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशक वा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का लागून, वीज पडून मृत्यू, उंचावरुन पडून मृत्यू, सर्प, विंचू दंश, जनावरांचा हल्ला, दंगल वा अन्य कारणाने अपघात झाला असेल तर त्या पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावेत, आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

loading image
go to top