esakal | सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने
sakal

बोलून बातमी शोधा

EID

सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : मुस्लिम बांधवांकडून गुरुवारी (ता.२१) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बकरी ईद संदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे. (government announced notifications regarding the celebration of Bakari Eid during corona)


कोरोना प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्याचे भासत असले, तरी अजूनही संकट टळलेले नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे सण-उत्सव, कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना केल्या आहे. येत्या २१ तारखेला मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी केली जाणार आहे. बकरी ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सामुदायिक नमाज पठण करतात. यावर्षी मुस्लिम बांधवांनी ईद साध्या पद्धतीने साजरी करत घरातच नमाज पठण करावयाचे आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारच्या गृह विभागाकडून घोषित करत त्या संदर्भातील परिपत्रक प्रसारित केले आहे. परिपत्रकामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुस्लिम बांधवांना साध्या पद्धतीने ईद साजरी करावी लागणार आहे. ईदची नमाज पठणासह अन्य धार्मिक विधी घरातच करावी लागणार आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना प्रादुर्भाव बहुतांशी प्रमाणात कमी झाला आहे. रुग्णसंख्यादेखील घटते आहे. गेल्यावर्षी ईद साजरी करता आली नाही, परंतु यंदा उत्साहात साजरी करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळण्याची आशा होती. गृहविभागाच्या प्रसारित केलेल्या परिपत्रकामुळे बांधवांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. असे जरी असले तरी प्रशासनास सहकार्य करण्याच्या प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांकडून देण्यात आल्या.

हेही वाचा: मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम

अशा आहे सूचना
- ईदगाह, मशीद, सार्वजनिक ठिकाणी पठाण करू नये.
- धार्मिक विधी घरातच करावे.
- कुर्बानीसाठी लागणारे जनावर ऑनलाइन पद्धतीने खरेदी करावेत.
- शक्य असल्यास प्रतीकात्मक कुर्बानी करण्यात यावी.
- सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, एकत्र जमाव करू नये.
- स्थानिक सूचना, परवानगीचे पालन करावे.

(government announced notifications regarding the celebration of Bakari Eid during corona)

हेही वाचा: पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

loading image