Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस आज नाशिकमध्ये

Ramesh Bais
Ramesh BaisEsakal

Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस गुरुवारी (ता. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आढावा बैठक होईल. (Governor Ramesh Bais in Nashik today news)

सकाळी पावणेदहाला हेलिकॉप्टरने मुंबईहून राज्यपालांचे किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलच्या हेलिपॅडवर आगमन होईल. इथून सकाळी दहाला ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात दाखल होतील. तेथे सकाळी दहा ते दुपारी बारादरम्यान आढावा बैठक होईल.

Ramesh Bais
Governor Ramesh Bais : राज्य आणि केंद्र सरकारांनी शिक्षणाची जबाबदारी घ्यावी

त्यानंतर विद्यापीठात तासभर राज्यपालांची राखीव वेळ असेल. दुपारी दीडला राज्यपालांचे मुक्त विद्यापीठात आगमन होईल. तीनपर्यंत जिल्ह्याची आढावा बैठक होईल. तदनंतर साडेचारपर्यंत मुक्त विद्यापीठाची आढावा बैठक होईल. तेथील हेलिपॅडवरून पावणेपाचला हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

Ramesh Bais
Governor Ramesh Bais : निलम गोऱ्हे यांचे पुस्तक म्हणजे संघर्षशील महिलांची कहाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com