Nashik News : विनानिविदा 15 लाखांपर्यंत कामे करण्याची ग्रामपंचायतींना मर्यादा

Rural Development Department
Rural Development Departmentesakal

नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनी मंजूर केलेली अथवा ग्रामपंचायतींना स्वनिधीतील कामे विभागनिहाय पद्धतीने करायची असल्यास १५ लाखांपर्यंतची कामे विनानिविदा करता येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. (Gram Panchayats are restricted from doing work up to 15 lakhs without tender Nashik Latest Marathi News)

Rural Development Department
Nashik Lumpy Update: ‘लम्पी’ने येवल्यातील शेतकऱ्याची वाढविली चिंता; तालुक्यात 8 जनावरे बाधित

गत सात वर्षांमध्ये विनानिविदा व निविदा काढून कामे करण्याच्या मर्यादांमध्ये तीन वेळा बदल झाले होते. याशिवाय अनेक जुने शासकीय निर्णयदेखील अधिक्रमित केले होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना विनानिविदा कामे करण्याची मर्यादा किती रकमेची आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शासनाच्या वित्त विभागाने शासकीय परिपत्रक काढून हा संभ्रम दूर केला आहे. राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर ही मर्यादा वाढवून दहा लाख रुपये करण्याचा निर्णय झाला होता.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Rural Development Department
Nashik News : बळीराजाला ऐन हंगामात MSEDCLचा वीजतोडणीचा शॉक!; पाणी असूनही शेतकरी अडचणीत

गत सरकारी निर्णय अधिक्रमित केल्यामुळे ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून मंजूर झालेले कामे विभागनिहाय करायचे असल्यास त्याची मर्यादा किती रकमेची आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. यावर, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून पंधरावा वित्त आयोग, जनसुविधा, नागरी सुविधा आदी कामे ग्रामपंचायतींना मंजूर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीनेच ते काम करण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना विनानिविदा १५ लाख रुपयांपर्यंतची कामे करता येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

Rural Development Department
Digital India : खिशातच बँक घेऊन फिरतात लोक; डिजिटल व्यवहारामुळे ATMही ओस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com