Gram Panchayat Election : आरक्षण चुकलेल्या ग्रा. पं.त आता नव्याने सोडत

Gram Panchayat
Gram Panchayatesakal
Updated on

Gram Panchayat Election : मागील वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीचे आरक्षण चुकलेल्या ग्रामपंचायतीत आता नव्याने आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. (gram panchayats where reservation for election was missed new lottery for reservation will be drawn nashik news)

मागील २०२२ वर्षात चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण झाल्यामुळे निवडणुका होवू न शकलेल्या ग्रामपंचायतीसोबतच यंदाच्या जानेवारी २०२३ ते डिसेंबर २३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

त्यासाठी निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार, काल (ता.१६) आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gram Panchayat
Nashik LLB Admission : एलएलबी नोंदणीसाठी या तारखेपर्यंत मुदत; फेऱ्यांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

२१ जूनला प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता दिली जाईल. सोमवारी (ता.२६) प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होईल.

त्यानंतर २७ जून ते ३ जुलै दरम्यान आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करून घेतल्या जातील. ७ जुलैला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हरकती विचारात घेऊन अभिप्राय घेतला जाईल. १२ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अंतिम अधिसूचनेला मान्यता दिली जाईल. १४ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.

इगतपुरीत १६ गाव

लक्ष्मीनगर, कृष्णनगर, टाके घोटी, धारगाव, दौडत, शिरसाठे, नागोसली, ओंडली, बोरटेंभे, सोमज, मोगरे, उंबरकोन, आडवन, नांदगाव सदो, कुशेगाव, मोडाळे.

Gram Panchayat
Nashik BJP News : दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड : केशव उपाध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.