esakal | आजीजवळ पैसे बघून नातवाचे डोळेच फिरले...केले असे भयानक कृत्य..
sakal

बोलून बातमी शोधा

grandma and grandson 1.jpg

कमळाबाई घटनेपूर्वी काही दिवस आधी सिन्नर येथील मोठा मुलगा सुभाष यांच्याकडे गेल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता, नातू आकाश घटना घडल्यापासून सिन्नर येथील घरी गेला नसल्याचे समजले. कमळाबाई सिन्नरला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याजवळ जुने घर विकल्याचे दोन लाख रुपये होते. त्यानंतर त्या सिन्नरहून जळगाव (निं.) येथे आल्या. आकाशला आजीजवळ पैसे आहेत, याची कल्पना होती. 

आजीजवळ पैसे बघून नातवाचे डोळेच फिरले...केले असे भयानक कृत्य..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : पैशांसाठी आजीचा खून करणाऱ्या आकाश सुभाष जगताप (वय 25, उद्धव भवन, ज्ञानदा पार्क, सिन्नर) या नातवासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. 

असा घडला प्रकार...

कमळाबाई सिन्नरला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याजवळ जुने घर विकल्याचे दोन लाख रुपये होते. त्यानंतर त्या सिन्नरहून जळगाव (निं.) येथे आल्या. आकाशला आजीजवळ पैसे आहेत, याची कल्पना होती. 25 फेब्रुवारीला मध्यरात्री तिघेही सिन्नर येथून मोटारसायकलने जळगाव (निं.) येथे आले. आकाशने आजीकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी कमळाबाईचा गळा दोरीने आवळून ठार केले. नंतर तिघे सिन्नरला पळून गेले. दुसऱ्या दिवशी आकाश जगतापने त्याचा साथीदार आकाश शिरसाठला पंधरा हजार, अजय ताकतोंडेला दहा हजार रुपये देऊन तो पुणे येथे निघून गेला. आकाश जगताप याच्यावर सायखेडा पोलिस ठाण्यात चोरीचा, तर आकाश शिरसाठ याच्यावर सिन्नर पोलिस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल आहे. तिघांना न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ही कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ, संदीप दुनगहू, उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, रतीलाल वाघ आदींनी केली. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

नातू घटना घडल्यापासून घरी गेला नव्हता...
तालुक्‍यातील जळगाव (निं.) येथे 25 फेब्रुवारीला कमळाबाई जगताप (वय 65) या वृद्धेचा दोरीने गळा आवळून खून झाला होता. कमळाबाई घटनेपूर्वी काही दिवस आधी सिन्नर येथील मोठा मुलगा सुभाष यांच्याकडे गेल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता, नातू आकाश घटना घडल्यापासून सिन्नर येथील घरी गेला नसल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला कसारा (जि. ठाणे) येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आकाश शिरसाठ (वय 21, शिवाजीनगर, सिन्नर) व अजय ताकतोंडे (वय 18, उद्योग भवन, सिन्नर) यांच्या मदतीने आजी कमळाबाईचा जळगाव (निं.) येथे येऊन गळा दोरीने आवळत खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आकाश व अजयला अटक केली आहे.

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

loading image