Nashik Winter Update : निफाडला नीचांकी 5.6 अंश तापमान; द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

मकरसंक्रांतीपासून थंडीने तालुक्यात बस्तान बसविले असून, या हंगामातील नीचांकी तापमान बुधवारी (ता.२४) नोंदविले गेले.
winter
winteresakal

Nashik Winter Update : मकरसंक्रांतीपासून थंडीने तालुक्यात बस्तान बसविले असून, या हंगामातील नीचांकी तापमान बुधवारी (ता.२४) नोंदविले गेले.

निफाडच्या कृषी संशोधन केंद्रावर ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. (grapes farmer worried due to Niphad low temperature nashik winter update )

तापमानाचा पारा आणखी खाली आला, तर द्राक्ष मण्यांना तडे जाणे, द्राक्ष वेलींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावणे, याबरोबरच भुरी, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी ६.५ अंश सेल्सिअस तापमान होते. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले असूनल सकाळी व सायंकाळी रोग प्रतिकारक औषधांची फवारणी करावी लागत असल्याने द्राक्षबागेच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. उत्पादनात मात्र घट येण्याची शक्यता आहे.

winter
Nashik Winter Update : निफाड 5.6 अंश, नाशिक 9 अंशांवर; राज्‍यात नीचांकी तापमान

तथापि, कांदा, गहू, हरभरा पिकांसाठी थंडी पोषक ठरणार आहे. मात्र, थंडीत द्राक्षवेलींचे कार्य सुरू राहण्यासाठी पांढरी मुळी व पेशींची अविरत सुरू राहण्यासाठी पहाटे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक असते. पारा आणखी खाली आला, तर द्राक्षबागा वाचविणे अवघड होणार आहे.

द्राक्षबागांच्या बचावासाठी बागांत चिपाटे पसरवून धुराद्वारे उष्णता निर्माण केली जात आहे. बोचऱ्या थंडीचा सर्वाधिक सामना ऊसतोड मजुरांना करावा लागत आहे. तालुक्यात सध्या कांदालागवड अंतिम टप्प्यात आली असून, त्यासाठी महिला मजूर दिवस उगवताच घराबाहेर पडत आहेत.

''कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागेतील मण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे, तर अर्ली द्राक्षे साखर आणि पाणी उतरण्याच्या टप्प्यात आहेत. पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंमुळे करपा वाढेल. पहाटे ड्रीपद्वारे बागांना पाणी द्यावे.''-केशव घायाळ, नैताळे

winter
Nashik Winter Update: किमान तापमान 10.1 अंशांवर! पाऱ्यात घसरण, 27.5 अंश कमाल तापमानाची नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com