Dada Bhuse : मे महिन्यात स्मृतिउद्यानाचे काम पूर्ण करा : पालकमंत्री दादा भुसे

Shiv Sena Chief Balasaheb Thackeray taking information about the Smriti Udyan work Guardian Minister Dada Bhuse.
Shiv Sena Chief Balasaheb Thackeray taking information about the Smriti Udyan work Guardian Minister Dada Bhuse.esakal

नाशिक : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (स्व.) बाळासाहेब ठाकरे स्मृतिउद्यानाची पाहणी पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता.३०) केली. पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून दहा कोटी रुपये उद्यानासाठी मंजूर करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने मे महिन्यात उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास नेऊन खुले करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Guardian Minister Dada Bhuse statement Complete memorial garden in May nashik news)

अजय बोरस्ते यांच्यासह संपर्कनेते राजू लवटे, शरद देवरे, शशिकांत कोठुळे आदी या वेळी उपस्थित होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांनी उद्यानाच्या प्रगतीची माहिती दिली.

उद्यानात पहिल्या टप्प्यात सॉफ्ट स्कील ट्रेनिंग सेंट, ई- लायब्ररी, कलादालन, आर्ट गॅलरी, किल्ल्यांची प्रतिकृती असलेली शिवसृष्टी, आशिया खंडातील सर्व खेळ मिळून तयार झालेले ॲडव्हेंचर गार्डन या कामांची माहिती देण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यामध्ये जॉगिंग ट्रॅकसह सायकल ट्रॅक लॅन्डस्केप आदी कामे पूर्ण केली जाणार आहे. उद्यानासाठी पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते स्मृतिउद्यानाच्या कामाचा नारळ फुटला होता.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Shiv Sena Chief Balasaheb Thackeray taking information about the Smriti Udyan work Guardian Minister Dada Bhuse.
New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली; शिक्षणतज्ज्ञ जोशी

ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यात दहा कोटी रुपये विशेष निधी दिला आहे. यामध्ये कलादालन उद्यान बोट क्लब वॉटर स्पोर्ट्स व थिएटर केले जाणार आहे. पालकमंत्री भुसे यांनी कामे वेगाने करण्याबरोबरच कामांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या.

"स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे जतन करण्यासाठी स्मृतिउद्यान उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यातील कामे अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील दहा कोटी रुपये खर्चाची कामे मार्गी लागतील." - अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

Shiv Sena Chief Balasaheb Thackeray taking information about the Smriti Udyan work Guardian Minister Dada Bhuse.
NCP News : मध्य विधानसभा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’च्या केंद्रस्थानी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com