Nashik News : हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदत

Nashik News : हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदत
esakal

Nashik News : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील२०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरीता १ जागा आहे. (Handloom Textile Technology Deadline for degree admission is 20th June nashik news)

वेंकटगिरीसाठी २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज २० जूनपर्यंत मागविण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज २० जून, २०२३ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News : हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदत
HSC Exam : भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; पोलिस तपास सुरू

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे.

तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहेत अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त एम. जे. प्रदीप चंदन यांनी कळविली आहे.

Nashik News : हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदत
B Sc Nursing CET Exam : बी. एस्सी नर्सिंगसाठी आता स्वतंत्र सीईटी; अर्ज दाखल करण्याची आज अंतीम मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com