Bikers Tension : बाईकर्सच्या स्टंटबाजीचा कहर! कधीही, कसेही येतात अन् धक्का देऊन जातात; अनेक जण जखमी

bikers
bikersesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : मागील काही काळापासून शहरात धूम बाईकर्सकडून नुसता उच्छाद मांडण्यात आला आहे. अलगदपणे आपल्या वाहनाजवळ येथून तेथून भुररर्रपणे सुसाट वेगाने दुचाकी हाकणाऱ्या स्टंटबाजांविरोधात सर्वसामान्यांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे. या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी याची दखल घ्यावी असे नागरिकांनी म्हटले आहे. (havoc of bikers problematic for citizens nashik news)

मागील आठवड्यातच एका बाईकस्वाराने धडक दिल्याने एक जण जखमी झाले. अशाच घटना शहरात दररोज घडत आहेत. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकला जाणारे अनेक नागरिकांना, ज्येष्ठांना या धूम बायकर्सचा तडाखा यापूर्वी बसलेला आहे. कुटुंबासह दुचाकीवर जाणारे अनेक नागरिक सुद्धा बायकर्सच्या या स्टंटबाजीमुळे जखमी झालेले आहे.

विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणीसुद्धा बायकर्स सुसाट वेगाने आपले वाहन कट मारूम पुढे नेण्याचे प्रयत्न करतात. त्यात आजूबाजूला असलेले अनेक वाहनचालक जखमी होतात. शाळेत सायकल व पायी जाणारे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर दुचाकी दामटणार्याचा धसका घेतला आहे.

धडक दिल्यानंतरही हे बायकर्स थांबत नाहीत तर दुप्पट वेगाने तेथून पळ काढतात, त्यामुळे ते नागरिकांच्या हाती लागत नाही किंवा त्यांच्या बाईकसचे नंबरसुद्धा नाहीत. पोलिसांनी या बायकर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

bikers
Jalyukta Shivar Yojana : जलयुक्तचा दुसरा टप्पा; रखडलेल्या कामांना हवे प्राधान्य!

उड्डाणपूल छे, हे तर रेसिंग ट्रॅकच

शहरातील चिंचखेड चौफुलीवरील उड्डाणपूल म्हणजे या धूम बायकर्सकरिता रेसिंग ट्रॅकच आहेत. उड्डाणपुलावर सर्रासपणे हे बायकर्स सर्व नियम धाब्यावर बसवून स्टंटबाजी करताना दिसतात. याशिवाय शहरातील कॉलेजच्या परिसरात हे बायकर्स धूम करीत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे वाहनाचे सायलेन्सर काढून टाकणे किंवा त्यात बदल करून त्याचा जास्तीत जास्त मोठा आवाज कसा होईल हे पाहण्यात येत असल्याने रस्त्याने जाताना ही वाहने ध्वनिप्रदूषण सुद्धा करीत आहेत. त्या आवाजाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. कुणाला पाहता येत नाही.

"वाहनांची वेगक्षमता पूर्वीपेक्षा अधिक वाढलेली आहे. त्यामुळे ती नियंत्रणात आणणे जिकरीचे काम आहे. पोलिसांनी अशा बायकर्सला धडा शिकविला पाहिजे."

- ज्ञानेश्वर चव्हाण, सरचिटणीस, काँग्रेस.

"धूमस्टाइल बाइकर्सच्या उच्छादामुळे केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर सर्वसामान्य लोक रस्त्यावर घाबरून वाहने चालवीत आहेत. कोण केव्हा येऊन धडकेल याचा नेम नाही, त्यामुळे अशा लोकांच्या बाईक काही दिवसांसाठी का होईना जप्त कराव्या."

- विजय सायखेडकर, नागरिक.

bikers
Nashik News : सिन्नरला दीड टन ई- कचरा संकलित!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com