esakal | यंदा गणेशोत्सवात आरोग्याचा जागर! रॅपिड ॲन्टिजेन टेस्टिंग, प्लाझ्मादानाला महत्त्व; मोठी मंडळे सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh-utsav.png

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना त्याचे रूपांतर आरोग्य उत्सवात करण्यासाठी शहरातील मोठी मंडळे सज्ज झाली आहेत. आरोग्य उत्सव साजरा करताना प्रशासनाला सहाय्य होईल, यासाठी अधिकाधिक रॅपिड ॲन्टिजेन टेस्टिंग करण्यावर भर राहणार आहे.

यंदा गणेशोत्सवात आरोग्याचा जागर! रॅपिड ॲन्टिजेन टेस्टिंग, प्लाझ्मादानाला महत्त्व; मोठी मंडळे सज्ज

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने गर्दीपासून ते मंडप धोरण व मिरवणुकांवर घातलेली बंदी लक्षात घेता गणेश मंडळांकडूनही शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळणार असून, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना त्याचे रूपांतर आरोग्य उत्सवात करण्यासाठी शहरातील मोठी मंडळे सज्ज झाली आहेत. आरोग्य उत्सव साजरा करताना प्रशासनाला सहाय्य होईल, यासाठी अधिकाधिक रॅपिड ॲन्टिजेन टेस्टिंग करण्यावर भर राहणार असून, कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मादानाला महत्त्व दिले जाणार आहे.

मोठी मंडळे सज्ज : रॅपिड ॲन्टिजेन टेस्टिंग, प्लाझ्मादानाला महत्त्व

मार्चमध्ये देशभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात कोरोनाने गाव, गल्ली कवेत घेतली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद व नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्युदरही वाढला आहे. यामुळे शासनाने सण, उत्सव व सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर आणले जात असून, गणेशोत्सवात मोठी गर्दी होत असल्याने ती टाळण्यासाठी विशेष खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. सर्वप्रथम ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूक यंदा होणार नाही. गर्दी होणार नाही, यासाठी आकर्षक देखाव्यांवर बंदी आणल्याने भक्तांचा हिरमोड झाला असला, तरी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी हेही महत्त्वाचे मानून यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा मानस मंडळांच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. मंडळाचा अध्यक्ष होताना दर वर्षी गाजावाजा होता; परंतु यंदा अनेक मंडळांचा उत्सव अध्यक्षांविना होणार आहे. एक गाव एक गणपती उपक्रमाप्रमाणे एका गल्लीत चार मंडळांऐवजी एकच गणपती बसणार आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

आरोग्य उत्सव तोडणार कोरोनाची साखळी
साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार असल्याने यंदा गणेश मंडळांनी आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट, रक्तदान शिबिर, कोरोना व स्वच्छताविषयक जनजागृती, मास्क वाटणे, रुग्णालयांची माहिती, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती आदी उपक्रम मंडळांकडून राबविले जाणार आहेत. मूर्ती दान करतानाही सामाजिकतेचे भान राखले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, एकाच वाहनातून नेऊन मूर्तींचे विसर्जन करणे आदी उपक्रमांचा त्यात सहभाग आहे. या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न राहणार आहे.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन : रमेश चौधरी

loading image
go to top