Shakambhari Paurnima : शाकंभरी पाैर्णिमेस शाक अन् पाकाला आरोग्‍यदायी महत्‍व!

Offering (indulgence) to goddess & badami devi Karnataka
Offering (indulgence) to goddess & badami devi Karnatakaesakal

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्ल : सकाळ वृत्‍तसेवा

नाशिक : सध्या हिवाळा सुरू असून शरिराला या काळात पालेभाज्यांना अधिक महत्त्व द्यायला हवे असे आपले आयर्वेद सांगते. त्यानुसारच या काळात अधिकाधिक जीवनसत्वयुक्त पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्‍यक आहे.

शांकभरी देवीला अशा १०८ भाज्यांचा भोग दाखवून त्या भाज्यांचे सेवन केले जाते. ही प्रथा नाशिकमधील काही कुटूंबे असूनही पाळत असून त्यानुसार त्यांनी आज शाकंभरी पोर्णिमेनिमित्त हा उत्सव साजरा करीत देवीला भाज्यांचा भोग अर्पण केला. (Healthy importance of vegetables and herbs in Shakambhari Paurnima nashik news)

नाशिकस्‍थित विविध धर्म व संस्‍कृती कुटुंबीय सण, उत्‍सव उत्‍साह व आनंदाने साजरे करतात. आज (ता. ६) पौष शुध्द शाकंभरी पोर्णिमेनिमित्त इंदिरानगर येथील अंकलजी, कर्नाटकी ब्राम्‍हण कुटूंबीय आपली परंपरा जपत शाकंभरी पोर्णिमा उत्‍सव मोठया आनंदाने साजरा करत आहेत. शाकंभरी शाक म्‍हणजे भाज्‍या व त्‍यांच्यापासून निर्माण होणारे रस वा पाक याचे आरोग्‍याच्या दृष्‍टीने खूप महत्‍व आहे.

इंदिरानगरातील अंकलजी कुटुंबीयांकडे पौष शुध्द अष्‍टमी शुक्रवारपासून (३० डिसेंबर२०२२) शाकंभरी नवरात्रोत्‍सवास प्रारंभ झाला असून कुटुंबीय एकच धान्य खात उपवास करत पोर्णिमेला पुरणाचा व शाकांचा उपलब्‍ध १०८ भाज्‍यांचा भोग शाकंभरी देवीस अर्पण करून नवरात्रोत्‍सवाची सांगता मोठया उत्‍साहात करतात.

दांपत्‍य, कुमारिका भोजन घालत उत्‍सवाची सांगता होते. परडीत भाज्‍यांचा भोग देवीस अर्पण करतात. यात ६० भाज्‍यांयुक्‍त जीवनसत्‍वे व आवळा यात ४० भाज्‍यांयुक्‍त जीवनसत्‍व अशा शंभर भाज्‍या व उपलब्‍ध इतर भाज्‍ असा मिश्र भाजीचा देवीला भोग अर्पण केला जातो.

Offering (indulgence) to goddess & badami devi Karnataka
Nashik News : आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव? ZP करणार शासनाला विनंती

ॠतुनुसार शाक पाकयुक्‍त आहाराचे महत्‍व

आपली भारतीय संस्‍कृती व परंपरा अतिशय समर्पक अशी आहे. मानवात असलेल्‍या तीन प्रकृती कफ, पित्‍त व वात याचे संतुलन राखण्यासाठी तसेच त्‍‍या, त्‍या ॠतूत प्रकृती अविरत कार्यरत राहून संतुलन साधण्यासाठी उपलब्‍ध कृषी उत्‍पादनात पालेभाज्‍या, धान्य व फळांचा आहारात समावेश करत निसर्गचक्राशी जुळवून घेतले जाते.

शाक म्‍हणजे औषधी गुणांनीयुक्त पालेभाज्‍या, फळे तसेच भाज्‍यांच्या मिश्रणातून तयार होणारी पाककला, कोशिंबीरी यांचा भोग देवास अर्पण करून व प्रसादरूपी भोग ग्रहण करत प्रकृती संतुलन राखता येते. यापासून मानवी शरीरास आरोग्‍यदायी खनिजे, लोह व जीवसत्‍वयुक्‍त आहार प्रात्‍प होत असतो.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Offering (indulgence) to goddess & badami devi Karnataka
Nashik News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी शहरात 20 पेलीकन सिग्नल!

ऊँ सर्वबाधा विनिर्मुक्‍तो

धनधान्य सुतान्विता

मनुष्‍ये मत्‍प्रसादेन

भविष्‍यती न संशया

– अन्नपूर्णा मंत्र

अर्थातः सर्व बाधा, संकटांपासून मुक्‍ती देणारी, संपत्ती, धान्य आणि मुलांसह समृध्दी, सर्व मनुष्‍य प्राणींना तुझ्या प्रसादाने भविष्‍यातही सुख, शांती व समृध्दी दे.

"शाकंभरी देवीच्या नवरात्रात धान्य फराळाने शरीरास शक्‍ती प्राप्त होत असते. पोर्णिमेला देवीस शाकांचा–भाज्‍यांचा भोग लावून त्‍याचे प्रसादरूपी सेवन सर्व कुटुंबिय एकत्रितरित्‍या करतो. शाकंभरी देवी ही आमची आराध्य दैवत आहे, तिच्या उपासनेने मन अगदी तृप्त होते."

- मनिषा अंकलजी, गृहीणी

"शाकंभरी देवीची उपासना पूर्वापार सुरू आहे. कुलधर्म तसेच पोर्णिमेचा उत्‍सव मोठया थाटात साजरा करतो. यातून मानसिक शांती मिळते." - श्‍याम अंकलजी, इंदिरा नगर

Offering (indulgence) to goddess & badami devi Karnataka
MGNREGA Policy : 5 लाखांपर्यंतची कामे शाखा अभियंत्यांकडे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com