Nashik : 16 बालकांवर मुंबईत हृदयशस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

16 children along with parents going to mumbai through special bus

Nashik : 16 बालकांवर मुंबईत हृदयशस्त्रक्रिया

नाशिक : राष्ट्रीय बाल स्वास्थ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शालेय मुलांमध्ये असलेल्या गुंतागुंतीचा हृदयाचा त्रास असतो. जिल्हा रुग्णालयाच्या पथकामार्फत केलेल्या शोध मोहिमेतून अत्यंत गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी (Heart Surgery) १६ मुलांवर मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. (Heart surgery on 16 children in Mumbai Nashik News)

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील व्हीजन हॉस्पिटल आणि मालेगावातील अल मींझान हॉस्पिटल लहान मुलांसाठी २-डी इको शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे ८९ हृदयरोग असलेल्या बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३४ बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते. याच उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात १६ बालकांवर अत्यंत गुंतागुंतीची हृदयशस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय येथून फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे या १६ बालकांना हृदयशस्त्रक्रियेसाठी विशेष बसमधून रवाना करण्यात आले.

हेही वाचा: 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल

सदरची शस्त्रक्रिया शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी डॉ. प्रमोद गुंजाळ व जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.डी. पाटील, डॉ. लक्ष्मण चव्हाण, मालेगाव सामान्य रुग्णालयाचे डॉ.हितेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक चौधरी, उद्धव हांडोरे, संदीप पाटील, फोर्टीज हॉस्पिटलचे विजय सावंत यांच्या पथकाने सदरचे नियोजन केले.

हेही वाचा: शहरातून चोरी झालेल्या कारचा मालेगावच्या जबरी चोरीत वापर

Web Title: Heart Surgery On 16 Children In Mumbai Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top