पन्नास कोटींची जकात...अन् "त्यांची' ईद होणार गोड!

malegaon photo1.jpg
malegaon photo1.jpg

नाशिक / मालेगाव : रमजानुल मुबारकच्या महिन्यात मुस्लिमबांधव आपल्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या अडीच टक्के रक्कम जकात (दान) स्वरूपात वाटप करतात. शहरातील 25 हजारांहून अधिक दानशूरांतर्फे यंदा 50 कोटी रुपयांचे जकात वाटप होणार असल्याने कामगार व गरजूंची रमजान ईद गोड होणार असल्याचे चित्र आहे.

पन्नास कोटींच्या जकातीने "त्यांची' ईद गोड  
शहरातील 15 हजार यंत्रमाग कारखानदार, नोकरदार, वकील, अभियंते, विविध व्यावसायिक, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रांतील सुमारे 40 हजारांहून अधिक दानशूर जकात वाटप करतात. येथील जकात मिळविण्यासाठी रमजानमध्ये अखेरच्या दोन आठवड्यांत देशभरातील धार्मिक संस्था, मदरसा व शिक्षण संस्थाचालकांसह अन्य स्वयंसेवी संस्था येथे येतात. लॉकडाउनमुळे या व्यक्ती येथे येऊ शकल्या नाहीत. यामुळे हे सर्व दान यंदा स्थानिकांच्या पदरात पडणार आहे.

मालेगावमध्ये चाळीस हजारांहून अधिक दानशूरांतर्फे वाटप 

या दानशूरांनी कोरोना संसर्ग काळात मदत वाटप केली आहे, तर बुधवार (ता. 20)पासून जकात वाटपही सुरू झाले आहे. प्रत्येक दानशूराने प्रत्येकी 50 हजार ते दोन लाखांपर्यंत जकातवाटप केल्यास ही रक्कम सुमारे 50 कोटींच्या आसपास होते. यात तब्बल दहा हजार यंत्रमाग कारखानदारच आहेत. जकात व मदतवाटप होत असल्यानेच सुमारे 12 हजार 500 कारखाने व दोन लाखांपेक्षा अधिक यंत्रमाग कामगार असताना कामगार उपायुक्तांकडे बंद काळात वेतन न मिळाल्याच्या अवघ्या 105 तक्रारी गेल्या. बिकट परिस्थितीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर तुम्ही पुढील वर्षाची जकात आगाऊ वाटू शकतात, असेही मौलानांनी सांगितले. याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनात कुठलीही दुर्घटना होऊ नये, नैसर्गिक वा आकस्मिक आपत्ती येऊ नये यासाठी साडेबावन्न तोळे चांदी किंवा तेवढी मालमत्ता असलेल्या व्यक्ती सदका वाटप करतात. 

फित्रा आणि ड्रायफ्रूटचेही वाटप 
ईद-उल-फित्रच्या नमाजपठणापूर्वी गरिबांना फित्रा (गहू) वाटपाची परंपरा व धार्मिक प्रथा आहे. यात मुस्लिमबांधव सात ते आठ किले गहू, तर काही दानशूर गरिबांच्या घरी शिरकुर्म्याचा सुगंध दरवळावा, त्यांना त्याची चव चाखता यावी यासाठी ड्रायफ्रूट वाटप करतात. याशिवाय मुबई, पुण्यासह मुस्लिमबहुल शहरातून मालेगावी गहू, तांदूळ, तेल, डाळ या स्वरूपात मदत आल्याने कामगारांना सहाय्य झाल्याचे यंत्रमाग कारखानदार युसूफ इलियास यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com