esakal | आनंदवार्ता! राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिकमध्ये सर्वाधिक; कशामुळे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Patient

राज्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिकमध्ये अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के, तर नाशिकमध्ये हेच प्रमाण ८४ टक्के असल्याचे आढळले आहे.

आनंदवार्ता! राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिकमध्ये सर्वाधिक; कशामुळे वाचा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक समाधानकारक बाब समोर आली आहे, ती म्हणजे, राज्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिकमध्ये अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के, तर नाशिकमध्ये हेच प्रमाण ८४ टक्के असल्याचे आढळले आहे.

ऑगस्टमध्ये मागील महिन्याचे विक्रम मोडीत निघाले

एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. मेच्या तुलनेत जून, त्या तुलनेत जुलैत अधिक रुग्ण वाढले. ऑगस्टमध्ये मागील महिन्याचे विक्रम मोडीत निघाले. ऑगस्टअखेर कोरोनारुग्णांची संख्या २० हजारांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना प्रशासनाने तपासण्या वाढविल्या आहेत. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे ४० नागरिकांच्या तपासण्या सुरू केल्या. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट सुरू केल्या. फीव्हर क्लिनिकची निर्मिती करण्यात आली आदी उपाययोजनांच्या माध्यमातून रुग्णसंख्या अधिक दिसू लागली. मात्र त्याप्रमाणे उपचारदेखील सुरू झाले. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

सात दिवसांत ९ टक्क्यांची वाढ
१९ ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजारी पार गेला असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. जूनमध्ये रुग्णांच्या ४२.६० टक्के रुग्ण बरे झाले. जुलैत ७१ टक्के, ११ ऑगस्टपर्यंत ७५ टक्के रुग्ण बरे झाले. १९ ऑगस्टपर्यंत तब्बल ८४ टक्के रुग्ण बरे झाले. राज्यात एकूण बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के, तर हेच प्रमाण नाशिक शहरात ८४ टक्के झाले आहे. ११ ते १९ ऑगस्ट या कालावधीत बरे होण्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले आहे. सात दिवसांत पाच हजार ८७९ रुग्ण शहरात बरे होऊन घरी गेले.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन : रमेश चौधरी 

loading image
go to top