Nashik | ऐतिहासिक वारसा लाभलेले चित्रपटगृह मोजतेय शेवटच्या घटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijayanand theatre nashik

Nashik | ऐतिहासिक वारसा लाभलेले चित्रपटगृह मोजतेय शेवटच्या घटका

जुने नाशिक (जि. नाशिक) : भद्रकाली बादशाही कॉर्नर परिसरात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले विजयानंद चित्रपटगृह आहे. अत्याधुनिक मल्टिप्लेक्सच्या जमान्यात हे चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड झाले आहे.


अनंत कान्हेरेेंनी जॅक्सनचा वध येथेच केला

विजयानंद चित्रपटगृहास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात विजयानंद चित्रपटगृह नसून नाट्यगृह होते. २१ डिसेंबर १९०९ रोजी या नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळाचे शारदा नाटकाचा प्रयोग सुरू होता. कलेक्टर जॅक्सन नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी येथे आले होते. स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांनी या वेळी जॅक्सन यांच्यावर गोळीबार करत त्यांचा वध केला. त्यानंतर १० एप्रिल १९१० रोजी अनंत कान्हेरे आणि त्यांचे सहकारी कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तिघांना फाशी देण्यात आली. असा मोठा इतिहास लाभलेल्या नाट्यगृहाचे स्वातंत्र्यानंतर चित्रपटगृहात रूपांतर झाले. असे हे चित्रपटगृह सध्या काळाच्या पडद्यावर पडले आहे. सर्वत्र अत्याधुनिक मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाचा बोलबाला आहे. त्यामुळे सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहांकडे नागरिकांचा कल काहीसा कमी झाला आहे.

हेही वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर

चित्रपटगृहाचे पुन्हा नाट्यगृहात रूपांतर व्हावे...

गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहे बंद होती. त्यामुळे आजही हे चित्रपटगृह बंद स्थितीत आढळून येत आहे. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विजयानंद चित्रपटगृहाचे जतन होणे आवश्यक आहे. पुन्हा या चित्रपटगृहाचे रूपांतर स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे नाट्यगृहात रूपांतर केले तर, उत्कृष्ट प्रतीचे नाटकांचे प्रयोग होण्यास मदत मिळेल. शिवाय उत्सवसोहळेदेखील करता येऊ शकतील. यामुळे अनंत काळापर्यंत चित्रपटगृहाचे ना केवळ जतन होईल तर नवीन पिढीसदेखील इतिहासाची ओळख होण्यास मदत होईल. नाट्यगृह झाल्यास आणि विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात. असे असताना आज हे चित्रपटगृह शेवटची घटका मोजत आहे.

हेही वाचा: नाशिमधल्या पहिल्‍या BH सिरीज वाहनाची आरटीओत नोंदणी

loading image
go to top