नाशिमधल्या पहिल्‍या BH सिरीज वाहनाची आरटीओत नोंदणी | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BH series

नाशिमधल्या पहिल्‍या BH सिरीज वाहनाची आरटीओत नोंदणी

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहने नोंदणीसाठी भारत सिरीज उपलब्‍ध करुन दिली होती. ऑगस्‍ट अखेरीस यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले होते. अशात नाशिक प्रादेशिक परीवहन कार्यालयाअंतर्गत BH सिरीजच्‍या पहिल्‍या वाहनाची नोंदणी नुकतीच झाली आहे. यामुळे वाहनधारकाचा अन्‍य राज्‍यात स्‍थलांतरानंतर वाहनाची पुर्ननोंदणीसह अन्‍य ताण मिटणार आहे.

पुर्ननोंदणी, NOC मिळविण्यासारख्या कामांपासून मुक्‍तता

इगतपुरी तालुक्‍यातील ऋषिकेश पंढरीनाथ गायकर यांनी खरेदी केलेले वाहन या नव्‍या सिरीजचे पहिले मानकरी ठरले आहे. नुकतीच या नवीन वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया नाशिक प्रादेशिक परीवहन कार्यालयात पार पडली. राष्ट्रीय पातळीवर ऑगस्‍ट अखेरीस ही सिरीज उपलब्‍ध झाली असली तरी BH सिरीजची प्रथम नोंदणी नुकतीच झालेली आहे. केंद्र शासन, राज्‍य शासनाचे कर्मचारी, लष्कारात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अन्‍य राज्‍यात दीर्घ कालावधीसाठी वास्‍तव्‍य करणाऱ्या वाहनधारकांसाठी ही सुविधा उपलब्‍ध आहे. या सिरीजमुळे संबंधितांना पुन्‍हा अन्‍य राज्‍यातील स्‍थानिक आरटीओ कार्यालयात पुनर्नोंदणी, आधीच्‍या कार्यालयातून NOC मिळविण्यासारख्या कामांपासून मुक्‍तता मिळत आहे.

हेही वाचा: आगामी निवडणूकांमध्ये मतदारांची संख्या घटणार?

अशी आहे BH सिरीजची रचना...

भारत सिरीजअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांमध्ये सुरवातीचे दोन आकडे हे नोंदणीचे वर्ष दर्शविते. त्‍यानंतर BH व पुढे चार आकडी वाहन क्रमांक व शेवटी अक्षर (AA, AB) अशी या वाहनांच्‍या नंबर प्‍लेटची रचना असते.

असा असेल BH सिरीजचा कालावधी

स्थानिक आरटीओ कार्यालयात नोंदणी करताना नोंदणी कराची रक्कम एकदाच भरून १५ वर्षांकरीता वाहनाला परवाना मिळतो, मात्र BH सिरीजमध्ये सुरूवातीला २ वर्षांसाठी नोंदणी होणार असून पुढे ज्या राज्यात वाहन असेल त्या राज्याच्या धोरणानुसार रिन्यू करावे लागेल.

हेही वाचा: येतेय 'मेड इन इंडीया' इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त 499 रुपयात करा बुक

''केंद्र शासनाच्‍या धोरणानुसार भारत सिरीजअंतर्गत नोंदणी सुविधा उपलब्‍ध झालेली आहे. नवीन वाहनधारकांसाठी ही वैकल्‍पिक सुविधा आहे. आरटीओ कार्यालयाअंतर्गत पहिल्‍या वाहनाची भारत सिरीजअंतर्गत नोंदणी झालेली आहे.'' - वासुदेव भागवत, सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी.

loading image
go to top