esakal | नाशिक : 5 खासगी रुग्णालयांनी केला कोरोना रुग्णांना उचाराअंती 4 लाखांचा परतावा
sakal

बोलून बातमी शोधा

corona patients

नाशिक : कोरोना रूग्णांना उपचाराअंती 4 लाखांचा परतावा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार करताना घेण्यात आलेले जादा बिलांचा परतावा रुग्णालयाकडून सुरू झाला आहे. पाच खासगी रुग्णालयांना चार लाख रुपयांची रक्कम रुग्णांच्या नातेवाइकांना परत केली आहे. शहरातील ५५ रुग्णालयांनी रुग्णांना उपचाराअंती आकारलेल्या एकूण देयकांपैकी पाच कोटी ९१ लाख रुपये जादा घेतल्याचे आढळले आहे.

पाच कोटी ९१ लाख रूपयांची तफावत

शासन नियमाप्रमाणे कोरोना रुग्णांवर उपचार करताना ८० टक्के बेड हे कोरोना उपचारासाठी तर वीस टक्के बेड इतर आजारांवर म्हणजेच रुग्णालय व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. मात्र, कोरोना उच्चतम पातळीवर असताना खासगी रुग्णालयांनी या नियमांचा भंग केला. एकूण बेडच्या संख्येपेक्षा अनेक रुग्णालयांमध्ये कमी रूग्ण संख्या दर्शवून पालिकेच्या पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागाने ५५ रुग्णालयांच्या बिलांची तपासणी केली. त्यात एकूण पाच कोटी ९१ लाख रूपयाची तफावत आढळून आली. सदरची रक्कम रुग्णांना परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लेखापरिक्षण विभागाने नोटीस बजावल्यानंतर पाच रूग्णालय प्रशासनाने चार लाख रुपयांचा परतावा दिला आहे. उर्वरित रुग्णालयांनी अतिरिक्त आकारलेले बिल तातडीने रुग्णांना अदा करावे, अशा सूचना दिल्या आहेत. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने चार रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करताना दोन रुग्णालयावर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा: बापा देखत वाहून गेलेल्या सौरभचा 2 दिवसानंतर मिळाला मृतदेह

हेही वाचा: कोटबेल येथे वृद्ध शेतकऱ्याचा खून; तब्बल आठ संशयितांना अटक

loading image
go to top