Nashik Crime News : अवैध विदेशी मद्यासह हॉटेल मालकाला अटक; फियाट कारसह मद्यसाठा जप्त

Crime
Crimeesakal

Nashik Crime News : अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या हॉटेल चालकास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

त्याच्याकडून १५ हजारांचे विदेशी मद्य व पाच लाखांची फियाट कार जप्त केली असून, याप्रकरणी सातपूर पोलिसात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hotel owner arrested with illegal foreign liquor Nashik Crime News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crime
Crime news : सावधान! फ्री फायर गेमच्या माध्यमातून अपहरणाची धमकी

मोहित मुकेश छंगानी (२५, रा. शुभम हाईट्स, मेट्रोझोन पाठीमागे, पाथर्डी फाटा) असे संशयित हॉटेलचालकाचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे हवालदार राजेंद्र घुमरे यांना अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याबाबत खबर मिळाली होती.

सदरील माहिती वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांना दिली असता, त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक उपनिरीक्षक राजाराम वाघ, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, गुलाब सोनार यांनी सातपूरमधील अशोकनगर येथील नागरगोजे कॉम्प्लेक्ससमोर सोमवारी (ता. १०) दुपारी दीडच्या सुमारास सापळा रचून छंगानीला फियाट कारसह ताब्यात घेतले.

१४ हजार ९७३ रुपयांची विविध विदेशी ब्रान्डच्या मद्याची वाहतूक ५ लाख रुपयांची सिल्वर रंगाची फियाट (एमएच १५ इपी ६८०१) कारमधून केली जात होती. विदेशी मद्य बाळगण्याचा परवाना नसताना त्याची वाहतूक करुन विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याने छंगानीविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Nashik Crime News: विनामस्तक धड आढळल्याने खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com