Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Paper Leak Case News: नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातून तीन संशयितांना आणि पुण्यातील एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Paper Leak Case News

Paper Leak Case News

ESakal

Updated on

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे आणि अहिल्यानगर पोलिसांनी नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी दोन आयुर्वेदिक डॉक्टर, एक ब्युटी पार्लर मालक आणि एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या पेपरफुटीमुळे ३ मे रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती. नाशिक आणि अहिल्यानगर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीबीआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुष्टी केली आहे की, पुणे शहरातील वाघोली येथे क्लिनिक चालवणाऱ्या एका आयुर्वेदिक डॉक्टरने नीट-यूजी पेपरची हार्ड कॉपी मिळवली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com