esakal | दहावी निकालातील त्रुटींचा अभ्यास महिनाअखेर चालणार; बारावीचा निकाल पुढील महिन्यात शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

ssc and hsc result

दहावी निकालातील त्रुटींचा अभ्यास महिनाअखेर चालणार

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : दहावीचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करताना उद्‌भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अडचणी आल्या. त्याची चौकशी करण्यासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवशी नेमलेल्या समितीला १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत महिनाअखेरपर्यंत असल्याने तोपर्यंत चौकशी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या चौकशीचा आणि बारावीच्या निकालाचा फारसा संबंध नाही. तांत्रिक अडचणी दूर होत बारावीचा निकाल पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असल्याची शक्यता शिक्षण विभागातून व्यक्त करण्यात येत आहे. (HSC-result-possible-next-month-marathi-news-jpd93)

संकेतस्थळाची पूर्व तपासणी केली होती का?

पुण्याचे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. शिक्षण आयुक्तालयातील प्रशासन उपसंचालक या समितीचे सचिव आहेत. निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधितांसमवेत बैठक घेतली होती का? निकाल जाहीर करण्यासंबंधी मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना पूर्वसूचना दिली होती का? संकेतस्थळाचे देखभाल करणाऱ्या कंपनीला पूर्वसूचना दिली होती का? विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने संकेतस्थळाची पूर्व तपासणी केली होती का? निकालासाठी आवश्‍यक क्षमतेच्या सर्व्हरचा वापर केला होता का? या मुद्यांची चौकशी होणार आहे. शिवाय संकेतस्थळ कोलमडल्यामुळे जबाबदार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीचा ठपका नेमका कुणावर ठेवला जाणार याकडे पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

हेही वाचा: डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

loading image