HSC Success Story: चिचोंडीच्या आशिषची सायकलवरून घौडदौड; आईला वडिलांना कामात मदत करत मिळवले यश

Ashish Madhvai
Ashish Madhvaiesakal

HSC Success Story : आईला शेतीमध्ये मदत, तर कधी वडिलांना स्लाइडिंगच्या कामात व ताडपत्री जोडण्याच्या कामात मदत करत चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील आशिष समाधान मढवई याने बारावीत येवला येथील जनता विद्यालयात ८७.३३ टक्के गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकावला. (HSC Success Story Chichondi Ashish travelled on bicycle got success by helping Mother father in work nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashish Madhvai
HSC Success Story: रोज 10 किमी सायकल प्रवासातून मिळविले यश! गोंदेगावची किर्ती मोरे महाविद्यालयात चौथी

कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा, क्लास नसताना त्याने रोज सायकलवरून प्रवास करत आणि स्वत:च अभ्यास करत हे यश मिळविले. अभ्यासाला तसा वेळ खूप कमी मिळायचा. कॉलेज सुटताच स्लायडिंग आणि ताडपत्री दुकानावर काम असायचे.

आईला शेती कामात मदत करून सायंकाळी सातला घरी आल्यावर तो रात्री अभ्यास करत असे. याच काळात त्याने स्वत:चे solusan made easy हे यु-ट्युब चॅनलही सुरू केले. त्यात तो अभ्यासाच्या ट्रिक टाकत असे. या यशाचे सर्व श्रेय तो शिक्षकांना आणि स्वतःच्या मेहनतीला देतो. दरम्यान, आशिषने दहावीतदेखील प्रथम क्रमांक पटकावला होता.

Ashish Madhvai
HSC Success Story : उसनवारीच्या पुस्तकातून यशाला गवसणी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com