esakal | VIDEO : संचारबंदी केवळ नावापुरतीच! नियम मोडून सर्रास अवैध दारूविक्री

बोलून बातमी शोधा

Liquor Sell

संचारबंदी केवळ नावापुरतीच! नियम मोडून सर्रास अवैध दारूविक्री

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : सिडको भागात अनेक ठिकाणी सर्रास दारूविक्री होत संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. तरीदेखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अवैध मद्यविक्री तेजीत सुरू

सिडको भागातील महाकाली चौक येथे अवैध मद्यविक्री तेजीत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. संचारबंदीकाळात बार, वाईन शॉप, हॉटेल बंद असले तरी ही बंदी केवळ नावापुरतीच उरली आहे. कमी श्रमात आणि कमी वेळेत जास्त पैसा मिळत असल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांची संख्या सिडको भागात वाढत आहे. एकीकडे भाजीबाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे, तर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शासनाने ठरवून दिलेल्या वेळा पेक्षाही अधिक वेळात किराणा दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. कारवाई फक्त नाकाबंदी सुरू असलेल्या ठिकाणी पहायला मिळत आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक!

''महाकाली चौकामध्ये देशी दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. लहान मुलांनादेखील बळीचे बकरे बनविले जात आहे. असे असतानाही येथे कारवाई होऊ नये याबाबत कमालीचे आश्चर्य निर्माण होत आहे.''

- मुकेश शहाणे, नगरसेवक

हेही वाचा: दुर्दैवी : शववाहिकेचे नाममात्र शुल्क असताना उकळतात बक्कळ पैसे