नाशिकमध्ये सापडले अवैध मद्यसाठ्याचे मोठे घबाड; 9 संशयितांना अटक

ट्रकमध्ये परराज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा होता.
alcohol
alcoholsakal

नाशिक : जिल्ह्यातून अवैधरीत्या मद्याची वाहतूक करताना ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रकमध्ये परराज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा होता. या ट्रकच्या पुढे व पाठीमागे संरक्षण देणाऱ्या दोन कारही जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई मोहदरी घाटात करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नरेंद्रसिंग ऊर्फ नरेश राजेंद्रसिंग रोतेला (रा. अहमदनगर), नारायण भगवान गिरी (रा. सातारा), सुनील रामचंद्र कांबळे (रा. पुणे), अजय सूर्यकांत कवठणकर (रा. सिंधुदुर्ग), रवींद्र दत्तात्रय काशेगावकर(रा. पुणे), जतिन गुरुदास गावडे (रा. सिंधुदुर्ग), सतीश संतोष कळगुटकर(रा. सिंधुदुर्ग), सुभाष सखाराम गोदडे (रा. अहमदनगर) व अशोक बाबासाहेब गाडे( रा. अहमदनगर) अशी मद्य तस्करांची नावे आहेत.

alcohol
Sim cards | अशाप्रकारे एकाच मोबाईलमध्ये चालवा ५ सिम

एक्साइज विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथक एकचे निरीक्षक जयराम जाखरे यांना मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. एक्साईजच्या पथकाने शुक्रवारी (ता.२३) सिन्नर तालुक्यातील मोहदरी शिवारातील हॉटेल सूर्याच्या बाजूला संशयास्पद वाहनांची तपासणी केली. त्यावेळी आयशर टेम्पोत (एमएच ४६ एफ २३९८) गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या ओल्ड बिल स्पेशल व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३ हजार ६०० सिलबंद बाटल्या (३०० बॉक्स) आढळून आल्या.

दरम्यान, सदरील घटनेची चौकशी करीत असताना, टेम्पोच्या संरक्षणार्थ क्रेटा कार (एमएच ०७ एजी ९१९९) ही मद्यवाहतूक करीत असलेल्या टेम्पोच्या पुढे आणि स्विफ्ट डिझायर (एमएच १६ सीव्ही ३१९२) कार ही पाठीमागे चालत होत्या. याअर्थी या दोन्ही वाहने मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनाला संरक्षण देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पथकाने या कारवाईत अवैध मद्यसाठा, ट्रक, दोन कार असा ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

alcohol
नाशिक : स्वाइन फ्लू, डेंगीच्या रुग्णात वाढ

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, दक्षता पथकाचे संचालक सुनील चव्हाण, नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक एकचे निरीक्षक जयराम जाखर, दुय्यम निरीक्षक जी. पी. साबळे, रोहीत केरीपाळे, यशपाल पाटील, जवान सुनील दिघोळे, धनराज पवार, राहुल पवार, राजकुमार चव्हाणके, अनिता भांड यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.

alcohol
नाशिक : खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास; वाहनधारक, पालक त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com