Mogre Crime Case: मोगरे खून प्रकरणी महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती; मुख्य संशयिताच्या पोलिस कोठडीत वाढ

Late Sanjay Mogre
Late Sanjay Mogreesakal

Mogre Crime Case : योगेश मोगरे खून प्रकरणात मुख्य संशयिताच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

गुन्ह्यात वापरलेला चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. (Important evidence in Mogre murder case to police Increase in police custody of prime suspect nashik crime news)

२३ मार्चला रात्री रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांचा खून झाला होता. संशयितांनी घटनास्थळावरून मोगरे यांची कार पळवून नेली होती. दुसऱ्या दिवशी कार वाडीवऱ्हे शिवारात सापडली होती.

कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करीत एका अल्पवयीन संशयितांसह मुख्य संशयिताला हरियानातून अटक केली. मुख्य संशयित अजितसिंग लठवाल (२४, रा. चुडाणा, ता. गोहाना, जि. सोनीपत) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास सोमवारी (ता. १०) न्यायालयात हजर केले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Late Sanjay Mogre
Mumbai Crime : फोन वापरण्यास घरच्यांचा विरोध; 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या

त्या वेळी न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली. दरम्यान, तपासातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. संशयितांनी मुंबईत फिरतानाच ज्या दुकानातून चाकू खरेदी केले होते, त्या दुकानातील संशयितांची फुटेज पोलिसांनी मिळविले आहेत.

त्याचप्रमाणे, मुंबईत फिरताना त्यांनी एक- दोन वेळा कार चोरीचाही प्रयत्न केला, परंतु त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळविला. परंतु, नाशिकमधून फक्त कार चोरून मुंबईतील एखाद्या श्रीमंताचे अपहरण करण्याचा त्यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले.

Late Sanjay Mogre
Nashik Crime News: विनामस्तक धड आढळल्याने खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com