Nashik Crime: विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या मंडळीला कारावास

Domestic Violence
Domestic Violenceesakal

Nashik Crime : उपनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे, यासाठी छळ करणाऱ्या संगमनेर स्थित पती, सासू, सासरा व दीरास न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.

उपनगर पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (In laws jailed for harassing married women Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Domestic Violence
Nagpur Crime: फडणवीसांच्या नागपुरात फोफावतेय गुन्हेगारी; गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ

पीडित विवाहितेचा संगमनेर (जि. नगर) येथील राहुल अशोक यादव यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१५ या दरम्यान आरोपी पती राहुल याच्यासह सासरे अशोक यादव, सासू आशा यादव व दीर विपुल यादव व आणखीन एका महिलेने छळ केल्याची फिर्याद विवाहितेने दिली होती.

फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावे, पैसे न आणल्याने आरोपींनी छळ करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार तत्कालीन उपनगरचे सहायक पोलिस निरीक्षक ए. ए. येवला यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

ॲड. एस. पी. घोडेस्वार यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. प्रथम वर्ग न्यायाधीश शर्वरी एम. जोशी यांनी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे चौघांना विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी व मारहाणप्रकरणी सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार गौरव साळवे यांनी कामकाज पाहिले.

Domestic Violence
Crime: हिंगणघाट येथे कृषी केंद्रात धाडसी चोरी; एक लाख तीन हजार रुपये लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com