esakal | दिलासादायक! जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ११२ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

बोलून बातमी शोधा

Corona
दिलासादायक! जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ११२ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : कोरोनाने देशात अक्षरशः थैमान घातले आहे.. जिल्ह्यात देखील कोरोनाची स्थिती बिकट आहे. गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यातून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्‍या एकूण संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत तीन लाख तीन हजार ९९४ बाधित आढळले असून, यापैकी दोन लाख ५२ हजार ११२ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

सद्यस्थिती…

सध्या ४८ हजार ५७१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी (ता. २५) दिवसभरात पाच हजार ६७५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेत. तर ३९ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.

पाच हजार ३९८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा

रविवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ७२७, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ७०९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील १२१, जिल्‍हाबाहेरील ११८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर चार हजार ७६९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. जिल्ह्या‍तील ३९ मृतांमध्ये नाशिक शहरातील अकरा, नाशिक ग्रामीणमधील २६, मालेगाव व जिल्‍हाबाहेरील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ३९८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी सर्वाधिक तीन हजार ४२१ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच हजार ५२६ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी पाच हजार १९२ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

शहरात बाधितांची संख्या सर्वाधिक

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या संख्येने तीन लाखांचा आकडा ओलांडला आहे. यात सर्वाधिक एक लाख ८२ हजार ३७६ कोरोनाबाधित नाशिक महापालिका क्षेत्रात आढळले असून, यापैकी एक लाख ५३ हजार ९७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. एक हजार ४८२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. सध्या २७ हजार ७९७ ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये आढळलेल्‍या एक लाख सहा हजार ३६८ रुग्‍णांपैकी ८६ हजार २१७ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एक हजार ४९६ मृत्‍यू झाले आहेत. सध्या १८ हजार ६५५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात अकरा हजार १३० बाधित आढळले असून, यापैकी नऊ हजार ५८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. २३६ बाधितांचा मृत्‍यू झाला.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..