

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Nashik News : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त होणारा निधी खर्च न झाल्याने जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी दायित्वात गेला आहे.
परिणामी, बिगर आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये एकही नवीन अंगणवाडी बांधकाम होणार नसताना, या भागातील तब्बल ८४७ अंगणवाड्यांना अद्याप इमारती नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील तब्बल एक हजार ८८ अंगणवाड्या भाडोत्री जागेत, तर ८९ अंगणवाड्या समाजमंदिर किंवा ग्रामपंचायतीच्या खोल्यांमध्ये भरत आहेत. (In non tribal talukas 847 Anganwadis still do not have buildings nashik news)
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अंगणवाड्या करीत असतात. अनेक अडचणींवर मात करीत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्ह्यात सुमारे पाच हजार २८५ अंगणवाड्या आहेत. यात आदिवासी क्षेत्रात दोन हजार ३१९, तर बिगर आदिवासी क्षेत्रात दोन हजार ९६६ अंगणवाड्या आहेत. यापैकी चार हजार १९७ अंगणवाड्या शासकीय इमारतीत भरतात.
१४९ अंगणवाड्या ग्रामपंचायती / प्राथमिक शाळांमध्ये भरत आहे. जागा नसल्याकारणाने ८९ अंगणवाड्या या तर समाजमंदिर आणि वाचनालयात भरत आहेत. अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्याने तब्बल ८५० अंगणवड्या इतर ठिकाणी (खासगी जागेत) आहेत. इमारती अथवा स्वतःची जागा नसल्याकारणाने अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या खेळण्यांचीही परवड सुरू आहे.
समाजमंदिरे किंवा अन्य ठिकाणी भरणाऱ्या अंगणवाड्यांत मुलांचे साहित्य ठेवायचे कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच यंदा अंगणवाडी बांधकामासाठी बिगर आदिवासी तालुक्यांना निधी प्राप्त होणार नाही. पावसाळ्यात अंगणवाडीला इमारत नसल्याने बालकांचे हाल होतात. त्यासाठी अंगणवाडी इमारतींना निधी मिळावा, अशी मागणी होत आहे.
प्रकल्प संख्या अंगणवाडी केंद्र संख्या शासकीय इमारत ग्रा.पं. /प्रा. शाळा समाजमंदिरे/वाचनालय खासगी जागेत इमारत नसलेले
आदिवासी क्षेत्र २३१९ २०७८ १२८ ६७ ४६ २४१
बिगर आदिवासी क्षेत्र २९६६ २११९ २१ २२ ८०४ ८४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.