Nashik News : बंडखोराच्या प्रभागामध्येच आदित्य यांनी रोवला संघर्षाचा झेंडा
नाशिक : ज्या देवळाली गावात बंडखोरांनी शिवसेनेला आव्हान दिले, त्याच देवळाली गावात सोमवारी (ता. ६) शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी धडाकेबाज जाहीर सभा घेत बंडखोरांवर वार करीत मुख्यमंत्री शिंदे गटाच्या बंडखोरीला आव्हान देताना दहशतीचा बोलबाला झालेल्या देवळाली गावच्या प्रभागात निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि देवळाली प्रभागातील लवटे बंधूंसह दोन विद्यमान, चार माजी नगरसेवकांना फोडून शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला, आज त्याच भागात आदित्य यांचा झालेला मेळावा उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचवणारा ठरला. (In rebel ward Aaditya thackeray conduct public meeting raised Strong atmosphere created by Aditya thackeray nashik News)
आधी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या प्रभागात एका नव्या चेहेऱ्याला बळ दिल्यानंतर आज बंडखोरी केलेल्या एकाच प्रभागातील चार माजी नगरसेवकांविरोधात तसेच वातावरण निर्मितीसाठी आवश्यक असलेले जे जे गरजेचे आहे ते ते सगळे करीत साध्य करीत शक्तिप्रदर्शन साधले.
आजच्या सभेचा सूर हा शिवसेनेतून फुटलेल्या बंडखोरावर टिकेचाच राहिला. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवजयंती बैठकीत वर्गणीची हिशेब मागितला म्हणून गोळीबार झाला, यात पालकमंत्री भुसे यांनी पोलिसांवर दबाव आणल्यामुळेच संशयितांना अटक झाली नाही, असा आरोप केला.
श्री. दत्ता गायकवाड यांनी पेट्यांचं राजकारण करून नाशिकला लोक फोडले गेले, असा आरोप केला. माजी आमदार वसंत गिते यांनी खोक्याचे आणि पेट्यांचं राजकारण मोडून काढतील, असे स्पष्ट केले. उपनेते घोलप म्हणाले,‘‘जे गेले ते गेले, त्यांना आम्ही गाडू; पण गेलेल्या गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका.’’
हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली