esakal | नाशिक : कैद्यांनी बनविलेल्या गणपती मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Inauguration of Ganpati idol sales center made by prisoners in Nashik

कैद्यांनी बनविलेल्या गणपती मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : बंदिवानांच्या कलेमुळेच कारागृहात मूर्ती बनविण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वात पहिले फ्रेंच कैद्याने कारागृहात मूर्ती तयार केली, त्यानंतर महाराष्ट्रातल्या कारागृह विभागात मूर्ती कलेची वाढ झाली असे प्रतिपादन कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी केले. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहच्या गणपती मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन नुकतेच नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडेय व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

कारागृहाला मिळणार हायटेक महसूल

दरवर्षीप्रमाणे कैद्यांनी बनवलेल्या मूर्त्यांनी कारागृहाची बाजारपेठ सजली आहे. या मूर्ती पाहण्यासाठी कारागृहात गर्दी होत आहे शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आकर्षक असून कारागृहाला या माध्यमातून हायटेक महसूल (high-tech revenue) मिळणार असल्याचे तुरुंगाधिकारी व कारखाना व्यवस्थापक शामराव गीते यांनी सांगितले.

हेही वाचा: इगतपुरीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार - नरहरी झिरवाळ

कैद्यांच्या श्रम, कष्ट, मेहनतीतून कलाकृतीचा उत्तम नमुना

नाशिक रोड कारागृहात अनेक प्रकारचे उद्योग निर्माण केले आहे. त्यातीलच मूर्तिकला विभाग आहे. कोरोनामुळे गणेशोत्सवावर बंधने आली असल्याने यंदा 540 मूर्त्या कैद्यांनी बनविल्या आहेत. 11 इंचापासून 22 इंचापर्यंतच्या मूर्त्या कैद्यांनी बनवल्या असून काही मूर्त्या तीन फुटापर्यंत आहे. कोरोनाच्या सावटामुळे मूर्त्यांची उंची कमी करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिक पुढे येत आहे. साडेसातशे रुपयांपासून पाच हजार रूपयांपर्यंत गणपती मूर्तींच्या किमती आहेत. सर्व मुर्ती शाडू मातीच्या असल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचत नाही. शिवाय कैद्यांनी श्रम, कष्ट मेहनत करून या मूर्त्या तयार केल्याअसून कलाकृतीचा उत्तम आणि सुबक नमुना असल्याचे नागरिक सांगत आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांच्या हस्ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहच्या गणपती मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांच्या हस्ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहच्या गणपती मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न.

मूर्तिकला जोपासणाऱ्या कैद्यांना शाबासकी

पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी कारागृह विभागाचे कौतुक करत मूर्तिकला जोपासणाऱ्या कैद्यांना शाबासकी दिली. या वेळी उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्यासह कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, शामराव गीते, पी बी निंबाळकर, संपत आडे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, यांसह नगरसेवक विशाल संगमनेरे, मंदा फड, तनुजा घोलप भोईर, विक्रम खरोटे, योगेश देशमुख, मंगेश मोरे आणि विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: रस्त्याचे काम अपूर्णच अन् श्रेयवादासाठी राजकीय सोशल वॉर सुरू

loading image
go to top