Fever in City : शहरात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

fever Latest Marathi News
fever Latest Marathi Newsesakal
Updated on

नाशिक : गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात तापाच्या रुग्णांची संख्या महापालिकेच्या दप्तरी कमी दिसत असली तरी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण उपचार घेत आहे. प्रत्येक एक ते दोन घरामागे रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, शहरात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेल्याने चिंता निर्माण झाली आहे. (Increase in fever patients in city Nashik latest marathi news)

पावसाच्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. शहरात गेल्या वर्षी जुलै अखेर ३६५७ तापाचे रुग्ण आढळून आले होते. या वर्षी ३०५८ रुग्ण आढळून आल्याचे महापालिकेच्या रुग्णालयामधील अहवालातून स्पष्ट होत असले तरी खासगी रुग्णालयांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्णांना उपचार सुरू आहे.

खासगी रुग्णालयातील आकडेवारी मात्र समोर येत नाही. महापालिकादेखील खासगी रुग्णालयातील आकडेवारी संकलित करत नाही. कोरोना दोन वर्षाच्या काळात इतर आजाराकडे लक्ष जात नव्हते.

कोरोना लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर आता ताप, अतिसार, स्वाइन फ्लू, डेंगी या आजाराकडे लक्ष केंद्रित होताना दिसत आहे. स्वाइन फ्लूचे ऑगस्ट महिन्यात ४९ रुग्ण आढळले असून, या वर्षात एकूण ७९ व संख्या झाली आहे. डेंगीचे २८ रुग्ण आढळून आले आहेत.

fever Latest Marathi News
Nashik : पॅरोल रजेवरील फरारी संशयितास अटक

स्वाइन फ्लूचा पहिला बळी

२०१७ मध्ये स्वाइन फ्लूमुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये अकरा रुग्णांचा बळी गेला होतात. त्यानंतर शहर व परिसरात कोरोना लाट सुरू झाली त्यामुळे इतर आजाराकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.

तीन वर्षानंतर शहरात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत झालेली व्यक्ती उपनगर येथील असून २९ जुलैला खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर मृत महिलेच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदरचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

fever Latest Marathi News
काझी गढीचा भाग कोसळला; 4 जणांची सुखरूप सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com