नाशिक : बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी भाड्यात वाढ

Increase in private passenger fares due to strike by bus workers
Increase in private passenger fares due to strike by bus workersSYSTEM

जुने नाशिक : परिवहन महामंडळाच्या बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बससेवा पूर्णपणे कोलमडली आहे. प्रवाशांवर त्याचा परिणाम झाला असून, त्यांना प्रवासासाठी काळी पिवळी टॅक्सी आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या वाहनधारकांकडून प्रवासी भाड्यात काही प्रमाणात वाढ केली आहे.

काही दिवसांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या संदर्भात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बहुतांशी मार्गांवरील बस सेवा कोलमडली आहे. त्याचा मोठा परिणाम प्रवाशांवर झाला आहे. दिवाळीच्या मोक्यावर बससेवा बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. दूरवरच्या प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स बस, तर शंभर ते दोनशे किलोमीटर प्रवासासाठी काळी पिवळी टॅक्सी तसेच खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी असल्याने प्रशासनाकडून निर्बंध शिथिल केले आहे. याची संधी साधत दोन वर्षापासून दिवाळीसाठी दुरावलेल्या कुटुंबीयांनी यंदा त्यांच्या मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला.

आता त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी परतावे लागत आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईला जोर आला आहे. भविष्यात पुन्हा कडक निर्बंध लागण्यापूर्वी संधीचा फायदा घेत नागरिक त्यांच्या घरातील विवाह सोहळे उरकून घेत आहे. वऱ्हाडी मंडळींसह सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुणे मंडळींना प्रवासाची अडचण भासत आहे. अतिरिक्त पैसे खर्च करून मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे टॅक्सी खासगी वाहनधारकांचे भाव वधारले आहे. त्यांच्याकडून इतर वेळेपेक्षा प्रवासी भाड्यात ३० ते ४० रुपयांनी वाढ केली आहे. कसारा, मुंबई मार्गावर चालणाऱ्या टॅक्सी आणि खासगी वाहनांनी अधिक प्रमाणात प्रवासी भाड्यात वाढ केल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे. धुळे, मालेगाव, सटाणा मार्गावरील टॅक्सी खासगी वाहनधारकांनी काही प्रमाणात प्रवास भाडे वाढविले आहे.

Increase in private passenger fares due to strike by bus workers
पारावरची शाळा, रेल्वेमध्ये ग्रंथालय; नाशिकमधील अनोखी शाळा चर्चेत

खासगी प्रवासी वाहनांच्या रांगा

परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्याने नागरिक टॅक्सी, खासगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घेत आहे. त्यामुळे महामार्गावरील द्वारका, मुंबई नाका, ठक्कर बाजार यासह महामार्गावरील विविध चौकात खासगी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Increase in private passenger fares due to strike by bus workers
महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवली - शिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com