new traffic rules India driving license suspension
esakal
पंचवटी (नाशिक) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नवीन निर्देशानुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले (New Traffic Rules 2026) आहेत. या नवीन नियमावलीची कडक अंमलबजावणी आता सुरू झाली असून, वाहनधारकांनी आपले थकीत चलन वेळेत भरावे, असे आवाहन नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.