लासलगाव- पाकिस्तान आणि चीनकडून स्वस्त दरात कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविला जात असल्याने भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. परिणामी, भारतीय कांद्याची निर्यात घटली असून, स्थानिक बाजारात दर ३० ते ४० टक्क्यांनी कोसळले आहेत. याचा मोठा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे.