सातपूर: नुकत्याच आयमा इंडेक्स २०२५ च्या लॉचिंगला आलेले राज्य उद्योग सचिव डॉ. अंबलगन पी यांनी नाशिकसाठी आशादायी संकेत दिले आहेत. मुंबई- दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून, यात नाशिकचा समावेश होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे जिल्ह्यात कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून, नव्या औद्योगिक वसाहती निर्माण होण्याचा मार्ग मोकळा होईल.