esakal | फ्रंटलाइन कोरोना वर्करला मिळेना बेड; पोलिस आयुक्तांचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

deepak pandey
फ्रंटलाइन कोरोना वर्करला मिळेना बेड; पोलिस आयुक्तांचा पुढाकार
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल्समध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनाच फ्रंटलाइन वर्करला बेड मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे. बेड राखीव ठेवावेत, असे स्पष्ट आदेश आयुक्तांना काढावे लागले आहेत.

पोलिस आयुक्तांचा बेडसाठी पुढाकार

पोलिस, होमगार्डस आणि महापालिका कर्मचाऱ्यांना बेड आणि उपचारांसाठी रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळणे तर दूरच, साधे बेडही मिळत नसल्याने फ्रंटलाइन वर्करमध्ये नैराश्याची भावना आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढणारे कोरोनाचे रुग्ण आणि हॉस्पिटलची संख्या यांचे प्रमाण फारच व्यस्त असल्याचा फटका रुग्णांना बसतो. यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणारे पोलिस, होमगार्डस, महापालिका हे विभाग अपवाद नाही. गत वर्षापासून आतापर्यंत शहर पोलिस दलातील ६७१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सद्य:स्थितीत १६० पोलिस अधिकारी व कर्मचारी बाधित असून, ११ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा: एका डोसनंतर कोरोनाबाधितांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत.. आरोग्य विभागापुढे आव्हान

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

हॉस्पिटल्स प्रशासनाला लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी

कोरोनाशी लढतांना फ्रंटलाइन वर्करही त्याला अपवाद नाही. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे फ्रंटलाइन वर्कसलाही बेड्स मिळत नाही. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होतो. कुटुंबीयांना बेड आणि उपचार मिळण्याची शाश्वती असल्यास फ्रंटलाइन वर्कर प्राधन्याने कर्तव्य बजावतील. त्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचे पोलिससूत्रांनी स्पष्ट केले. हा आदेश सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती शहरातील हॉस्पिटल्स प्रशासनाला लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी पोलिस ठाण्यांसह महापालिका प्रशासनाकडे सोपविली आहे.