Recruitment News : रिक्तपदे भरतीचा मार्ग मोकळा; महासभेत प्रस्ताव मंजूर!

Jobs
Jobs esakal

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्तपदांची जंबो भरती करण्यासाठी शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर महापालिकेने ११ विभागांच्या सेवा व प्रवेश नियमावलींना मंजुरी दिल्याने जवळपास २८०० रिक्तपदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर रिक्तपदांची भरती होईल. (Instructions from Govt for jumbo recruitment of vacancies in local bodies way for recruitment of 2800 vacancies has been cleared nashik news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची परिषद जानेवारी महिन्यात मुंबई भरविण्यात आली होती. या वेळी सर्वच आयुक्त व नगरपरिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निदर्शनास आणले होते.

त्याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी सेवा व प्रवेश नियमावली मंजूर करून शासनाकडे पाठवावे, अशा सूचना दिल्या. त्याअनुषंगाने महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत अकरा विभागांच्या सेवा व प्रवेश नियमावलींना मंजुरी देण्यात आली.

त्याचबरोबर महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रकाचा कार्यक्रम महासभेवर संमत करण्यात आला. २०२२ व २३ चे सुधारित २०२३-२४ चे प्रारूप अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाला मार्च पूर्वी महासभेची अंतिम मान्यता घेतली जाईल.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Jobs
Nashik News : अजबच आहे सारं...‘निर्भया’ पोलीसांना वडापाव खाऊ द्या अन् वाहतूक कोंडी होऊ द्या!

या विभागांच्या नियमावलीला मंजुरी
प्रशासकीय सेवा लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत) व अभियांत्रिकी (स्थापत्य) जलतरण तलाव, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती व तंत्रज्ञान या अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देण्यात आली.

या महत्त्वाच्या विषयांना मंजुरी
- मलनिस्सारण योजनेच्या ३२५ कोटींचे प्रस्ताव मंजूर.
- मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा ठेका.
- महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वयंचलित आग प्रतिबंधक यंत्रणा.
- पंचवटी विभागातील जलतरण तलाव देखभालीसाठी खासगी संस्थेकडे.
- टाकळी, कपिला संगम सिवेज पंपिंग स्टेशन तीन वर्षांसाठी खासगी ठेकेदाराकडे.

Jobs
Consumer Court : मेडिक्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com