International Yoga Day 2023 : शाळा, महाविद्यालयीन स्‍तरावर ‘योग’ असेल पर्यायी विषय! योगशिक्षण, संशोधनाला वाव

International Yoga Day 2023 Students have option of opting for Yoga as an optional subject at school college level nashik news
International Yoga Day 2023 Students have option of opting for Yoga as an optional subject at school college level nashik newsesakal

International Yoga Day 2023 : सुदृढ जीवन जगण्यासाठी प्रचार व प्रसार झालेल्‍या योगशास्‍त्राची व्‍याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत योगशास्‍त्रातील शिक्षण व संशोधनाला चालना मिळणार असल्‍याचे जाणकारांचे मत आहे.

आगामी काळात शाळा, महाविद्यालयीन स्‍तरावर योग या पर्यायी विषयाची निवड करण्याची संधीदेखील विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होऊ शकणार आहे. (International Yoga Day 2023 Students have option of opting for Yoga as an optional subject at school college level nashik news)

शारिरीक व मानसिक आरोग्‍य चांगले राखण्यासाठी गेल्‍या काही वर्षांमध्ये योगशास्‍त्राचा आधार घेतला जातो आहे. विविध वयोगटातून योगाचे प्रशिक्षण घेत नित्‍य साधना करणाऱ्या साधकांच्‍या संख्येत वाढ होत आहे. प्रारंभी सुदृढ आरोग्‍याचा मंत्र असलेल्या योगशास्‍त्रात आज संशोधनाच्‍या अनेक संधी उपलब्‍ध झालेल्‍या आहेत.

योगअभ्यास केल्‍यामुळे शरीरात नेमके काय व कसे बदल घडतात इथपासून तर आसनांचा शास्‍त्रोक्‍त आधारापर्यंतचा तपास शास्‍त्रीय दृष्टीकोनातून करण्याच्‍या संधी उपलब्‍ध आहेत. योगशिक्षक म्‍हणून करिअर करण्यासह योगशास्‍त्रात संशोधन करण्यापर्यंतचे पर्याय उपलब्‍ध झालेले आहेत.

त्‍यातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून शैक्षणिक व्‍यवस्‍थेत होणाऱ्या पुनर्रचनेत शालेय व महाविद्यालयीन स्‍तरावर क्रीडा शाखेत योग विषयाचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शालेय जीवनापासूनच योगाचे धडे गिरवताना, या शास्‍त्राविषयी गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

International Yoga Day 2023 Students have option of opting for Yoga as an optional subject at school college level nashik news
International Yoga Day 2023 : योग हा जागतिक परंपरेचा एक भाग ! पण तो जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचला?

योग चळवळीचे नाशिक केंद्र

नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या योग विद्या गुरुकुलच्‍या माध्यमातून देश-विदेशात योग शिक्षक घडविले जात आहेत. तसेच, शहर व परिसरात इतर अनेक संस्‍थांच्‍या माध्यमातून ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने योगशास्‍त्राचा प्रचार व प्रसार केला जात आहे. येथील स्‍नातकांनी योग विषयात पीएच. डी. पर्यंत उच्च शिक्षण घेतलेले आहे. त्‍यामुळे योग चळवळीचे केंद्र नाशिक ठरत आहे.

"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग हा पर्यायी विषय उपलब्‍ध करुन देण्याबाबत युजीसीसोबत पत्रव्‍यवहार केला आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये योगाचा सराव वाढण्यास मदत होऊन सामाजिक आरोग्‍य सुदृढ होण्यास मदत होईल. आगामी काळात योगशास्‍त्रात संशोधनाला चांगल्या संधी उपलब्‍ध आहेत." -प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी, सदस्‍य, अभ्यास मंडळ, पुणे विद्यापीठ.

"योगशास्‍त्राबाबत समाजात जागरूकता निर्माण झालेली असून, शाळा-महाविद्यालयांत योग विषयाचा अंतर्भाव झाल्‍यास शास्‍त्रोक्‍त योगशास्‍त्र शिकविले जाईल. त्‍यामुळे सुदृढ पिढी घडविण्यासाठी निश्‍चितच मदत होणार आहे." -प्रा. सुवर्णा निकम, योगशिक्षिका

International Yoga Day 2023 Students have option of opting for Yoga as an optional subject at school college level nashik news
International Yoga Day 2023 : ‘योगा’तून घडविले 8 हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य; चंचल माळींकडून सकारात्मक बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com