Nashik Police Weapons Exhibition : शस्त्र प्रदर्शनाने आधुनिक पोलिसिंगची ओळख; पोलीस रेडिंग डेचा आज समारोप

पोलीस रेझिंग डेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्र प्रदर्शनासह आधुनिक पोलिसिंगची ओळख नाशिककरांना गेल्या दिवसात झाली.
Introduction of modern policing with weapons display of nashik police nashik news
Introduction of modern policing with weapons display of nashik police nashik newsesakal

Nashik Police Weapons Exhibition : ऐरवी पोलिस म्हटले की त्यांच्याशी मैत्रीही नको अन्‌ शत्रुत्वही नको, अशीच सर्वसामान्याची भावना असते. तर लहान मुलांमध्ये पोलिसांपेक्षा त्यांच्याकडील शस्त्रांस्त्रांचे आकर्षण असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलीस-नागरिकांमध्ये सुसंवादाचा पुल बांधला गेला आहे.

पोलीस रेझिंग डेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्र प्रदर्शनासह आधुनिक पोलिसिंगची ओळख नाशिककरांना गेल्या दिवसात झाली. (Introduction of modern policing with weapons display of nashik police nashik news)

अबालवृद्धांसह बालगोपाळांनीही या प्रदर्शनाला भेट देत रविवारचा आनंदा घेतला. सिटी सेंटर मॉल येथे शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रेझिंग डेनिमित्ताने शस्त्र प्रदर्शन व आधुनिक पोलिसिंगचे प्रदर्शन भरविले होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पेतून आयोजित प्रदर्शनात पोलिसांची शस्त्रे, अद्ययावत वाहने आणि विविध विभागांची माहिती नाशिककरांना देण्यात आली.

शस्त्र प्रदर्शनामध्ये पिस्तुलपासून एके ४७ व आधुनिक शस्त्रांस्त्रांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या चिमुरड्यांसह नागरिकांनी शस्त्र न्याहाळतांना आनंद घेत माहिती घेतली. यावेळी पोलिसांच्या विविध शाखांचेही स्टॉल लावण्यात आलेले होते. वाहतूक शाखेच्या स्टॉलवर वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले जात होते. याचप्रमाणे, सायबर गुन्हेगारीबाबत पोलिसांकडून प्रबोधनात्मक माहिती दिली.

नाशिक पोलिसांच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनासह आधुनिक पोलिसिंगचा परिचय
नाशिक पोलिसांच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनासह आधुनिक पोलिसिंगचा परिचयesakal
Introduction of modern policing with weapons display of nashik police nashik news
Nashik Krushithon Exhibition : शेतकऱ्यांना संकटे पार करण्याची ताकद ‘कृषिथॉन’ मधून

दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकासह बॉम्ब शोधक व नाशक पथकाची माहिती उत्सुकतेने घेत होते. पोलीस कमांडोंसोबत सेल्फीही घेतली जात होती. तसेच, संकटकाळात डायल - १२२ या क्रमांकावर कशारितीने संपर्क साधावा आणि पोलीस कशारितीने पोहोचतात याचीही माहिती दिली जात होती. गेल्या दोन दिवसात या प्रदर्शनात शेकडो नाशिककरांनी भेट देत आनंद लुटला.

आज समारोप

शरणपूर रोडवरील शहर पोलिस कवायत मैदानावर आज पोलिस रेझिंग सप्ताहाचा समारोप होतो आहे. यानिमित्ताने ‘सिरेमोनियल परेड’ होणार यात सर्व पोलिस ठाणे व विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यावेळीही शस्त्रांसह पोलिसांच्या वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.

Introduction of modern policing with weapons display of nashik police nashik news
Nashik Police Weapons Exhibition : पोलीस दलाच्या शस्त्रांचे उद्या प्रदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com