esakal | ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानात पोलिसांचा समावेश करा 
sakal

बोलून बातमी शोधा

chhgan bhujbal.jpg

भुजबळ म्हणाले, की अभियानांतर्गत प्रत्येक घराघरांत जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध व माहिती लपविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. कोमॉर्बिड रुग्णांची अधिक काळजी घ्यावी. खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती रोज संकलित करण्यात यावी,

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानात पोलिसांचा समावेश करा 

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करावा. अभियानांतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकात पोलिसांचाही समावेश करावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानात पोलिसांचा समावेश करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.१९) येथील शासकीय विश्रामगृहावर  भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. 
आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल पाटील, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनंत पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सहायक निबंधक एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

येवला रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना
भुजबळ म्हणाले, की अभियानांतर्गत प्रत्येक घराघरांत जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध व माहिती लपविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. कोमॉर्बिड रुग्णांची अधिक काळजी घ्यावी. खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती रोज संकलित करण्यात यावी, अशा सूचना भुजबळ यांनी देत अभियान यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात यावी. लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने कोरोनाची चाचणी करण्यात यावी. लोकांमधील कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

भुजबळांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट
विवाह व इतर समारंभासाठी नियमभंग करून अधिक गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, मोठ्या गावांमध्ये कोविड तपासणी शिबिरे घ्यावीत, अशा सूचना दिल्या. या वेळी भुजबळांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. 
पंढरीनाथ थोरे, भाऊसाहेब भवर, बाळासाहेब लोखंडे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, सभापती संजय बनकर, गटनेते प्रवीण बनकर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, साहेबराव मढवई, सचिन कळमकर, अनिल सोनवणे, सुनील पैठणकर, भागूनाथ उशीर, दीपक पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन - ज्योती देवरे

loading image