Latest Marathi News | मनमाड रेल्वे स्थानकात अनियमितता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway News

Nashik News : मनमाड रेल्वे स्थानकात अनियमितता

मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विविध बाबींची तपासणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे मेगा ड्राईव्ह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मनमाडसह १६ प्रमुख रेल्वे स्थानकांची तपासणी करण्यासाठी ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

यात मनमाड रेल्वे स्थानकात अनियमिततेची ५० प्रकरणे आढळून आली असून यामुळे मनमाड रेल्वे स्थानकाला १ लाख २२ हजाराचा दंड लावत तो वसुल करण्यात आला आहे. अनियमितता व दंड प्रकरणी मनमाड रेल्वे स्थानक पहिल्या तीनमध्ये आले आहे. (Irregularities Manmad Railway Station fine of 1 lakh 22 thousand recovered Bhusawal team nashik news)

हेही वाचा: Jalgaon News : राजकीय इच्छेअभावी जळगावला आयपीएस DYSPची प्रतीक्षा

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल विभागातर्फे प्रमुख रेल्वे स्थानकात तपासणी मोहीम अंतर्गत १६ रेल्वे स्थानकात विशेष पथकाकडून मेगा ड्राईव्ह राबविण्यात आला.

या ड्राईव्हमध्ये खानपानाचे स्टॉल ,कर्मचाऱ्यांचा गणवेश, वैद्यकीय तपासणी, अन्नप्राधिकरणाचे पत्र मंजूरी, वस्तूंची विक्री - निर्मिती व कालबाह्यता तारीख, स्वच्छता आणि प्रवाशांकडून जादा दर आकारणे आदींची प्रमुख तपासणी केली.

या विशेष मोहिमेमध्ये पथकास २११ ठिकाणी अनियमितता आढळून आल्याने यात दहा लाख ४९ हजार रुपयाचा दंड पथकाने ठोकत तो वसुली केला. मनमाड बरोबरच अकोला रेल्वे स्थानकात २७ प्रकरणांमध्ये पाच लाख ३७ हजार तर भुसावळ रेल्वे स्थानकातून ३० प्रकरणांमध्ये एक लाख ७२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Accident News : मुलीची भेट स्मरणी ठेवत पित्याचा अपघाती मृत्यू

मनमाड अनियमिततेची ५० प्रकरणे

भुसावळ विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या पाहणीत मनमाड रेल्वे स्थानकात अनियमिततेची ५० प्रकरणे आढळून आली. यामुळे पथकाने यासाठी १ लाख २२ हजार रुपयाचा दंड वसुल केला. दंड व अनियमिततेत मनमाड पहिल्या तीनमध्ये आले आहे. मुख्य तपासणीत मनमाड मधून ४१ प्रकरणांवर ६५ हजार पाचशे रुपये, कर्मचाऱ्यांचा गणवेश, ओळखपत्र पार्सलची ओव्हर वेटेज, ग्राहकाकडून कंत्राटदारांकडून बेकायदेशीर आकारणी अशा तीन प्रकरणात १५ हजार रुपये दंड, ओवर चार्जिंग, स्वच्छता आदींमध्ये अकरा हजार पाचशे रुपये दंड, पार्किंग कराराअंतर्गत प्रवाशांकडून शुल्क आकारण्यासाठी योग्य दर उपलब्धता ,जास्त चार्जिंग कुपन वर तारीख आणि वेळ कर्मचारी ओळखपत्र पोलिस पडताळणी याची तपासणी केली असता दोन प्रकरणात २३ हजार रुपये दंडही वसुल केला.

हेही वाचा: Jalgaon News : अबब ! जात प्रमाणित करण्यासाठी 10 लाखांची लाच

नववर्षानिमित्त कसून तपासणी

देशातील मध्यवर्ती रेल्वे जंक्शन व सतत प्रवासी आणि गाड्यांची वाहतूक वर्दळ असणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकाची नवीन वर्षानिमित्त घातपात विरोधी तपासणी शनिवारी (ता.३१) बीडीडीएस पथक, मालेगाव येथील बॉम्बशोधक पथकातील "रॉकी" या श्वानाने कसून तपासणी केल्याची माहिती लोहमार्ग निरिक्षक शरद जोगदंड यांनी दिली. नवीन वर्षानिमित्त नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठा उत्साह नागरिकांमध्ये असून या निमित्ताने अनेकांनी प्रवासाचा प्लॅन आखला आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना सध्या गर्दी दिसत असून या गर्दीचा फायदा घेऊन कुठेही घातपात घडू नये यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावर तपासणी झाली. यात फलाटावरील प्रवासी सामान , रेल्वेची विविध कार्यालय , द्वितीय श्रेणी विश्रांती गृह, नवापादचारी पूल , पार्सल कार्यालय , तिकीट बुकिंग आदी परिसराची तपासणी झाली.

हेही वाचा: Jalgaon News : शहरात 7 रस्त्यांचे डांबरीकरण, 8 रस्त्यांचे खडीकरण