Jal Jeevan Mission: जिल्हयात 4 हजार 523 शाळांना नळजोडणी!

मार्च २०२४ अखेर १४५ शाळांच्या नळ जोडणीचे करावे लागणार काम
Jal Jeevan Mission News
Jal Jeevan Mission Newsesakal

Nashik School Water Connection : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतंर्गत जिल्हा परिषदेसह शहरी भागातील ४५२३ शाळांना नळ जोडणी करण्याचे उद्दिष्टये निश्चित केले होते. त्यापैकी ४ हजार ३७८ शाळांपर्यंत नळजोडणीचे काम (९६.७९ टक्के ) झाले असून १४५ शाळांना नळ जोडणी झालेली नसल्य़ाचे समोर आले आहे.

या शाळांना मार्च २०२४ अखेर नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. (Jal Jeevan Mission Connecting 4 thousand 523 schools in district By end of March 2024 work of connecting 145 schools will to be done nashik)

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हयात १२२२ योजना मंजूर असून, त्यासाठी १४५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. २०१९ पासून सुरु असलेल्या या योजनेत, योजनांना मंजूरी देण्याचे काम सुरू आहे. काही गावांमध्ये योजना सुरू होऊन पाणी देखील मिळाले आहे.

मात्र, अद्याप अनेक गावांना पाणी मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. याच योजनेतंर्गत शाळांना नळ जोडणी करण्याचे देखील काम सुरू झालेले आहे. मात्र, शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे देखील समोर आले आहे.

जिल्ह्यातील ४ हजार ५२३ शाळांना नळ जोडणी करण्याचे निश्चित झाले होते. यापैकी आतापर्यंत ४ हजार ३७८ शाळांना नळ जोडणी झाली असून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

उर्वरित १४५ शाळांमध्ये नळ जोडणीचे कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळांच्या बाबतीत बागलाण, देवळा, दिंडोरी, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर आणि येवला हे आठ तालुक्यातील शाळांमध्ये नळ जोडणीचे काम पूर्ण झालेले आहे.

जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन अतंर्गत ही कामे करत आहे. मात्र, ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समितीकडे प्रस्ताव मागवून तेथून जिल्हा परिषदेकडे येणे आणि त्यानंतर निधी नियोजनात घेऊन त्यानंतर कामे यामुळे विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jal Jeevan Mission News
NMC News: 2 महिने उलटले तरी घंटागाडी चौकशीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात! कारवाईची प्रतीक्षा

सार्वजनिक संस्थेमार्फत (जसे की, ग्रामपंचायत, लोकवर्गनी आदी) मालेगावमध्ये ६१ तर, नांदगावमध्ये ४२ ठिकाणी कामे सुरू आहेत.

तालुका -- उद्दिष्टये जोडणी झालेली कामे -- शिल्लक काम

बागलाण ३६९ ३६९ -
चांदवड २६४ २६२ २
देवळा १७८ १७८ -
दिंडोरी ३२७ ३२७ -
इगतपुरी २७९ २७३ ६
कळवण २६७ २६१ ६
मालेगाव ४९७ ४३६ ६१
नांदगाव ५२७ २१५ ४२
नाशिक १८२ १८२ -
निफाड ३५४ ३५४ -
पेठ २२० २२० -
सिन्नर ३११ ३११ -
सुरगाणा ३९३ ३७७ १६
त्र्ंयबकेश्वर २९१ २७९ १२
येवला ३३४ ३३४ -

Jal Jeevan Mission News
NMC RRR Centre News : समाजातील माणुसकी हरपली काय? दीड महिन्यात केवळ एकाची मदत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com