Jaykumar Rawal fake photo viral case Dhule
esakal
धुळे : सोशल मीडियाचा गैरवापर करून राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांचा एक बनावट (मॉर्फ) फोटो प्रसारित करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध (Fake Image of Minister Jaykumar Rawal Goes Viral) धुळे सायबर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २६) गुन्हा दाखल झाला आहे. तांत्रिक तपासणीनंतर हा फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले असून, अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.