Nashik News: JNRX फार्मास्युटिकल कंपनीच्या लिलावाचे आदेश; देणे थकल्याने कंपनी दिवाळखोरीत

 Court Order
Court Order esakal

Nashik News : सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील जेएनआरएक्स फार्मास्युटिकल कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने विविध वित्तीय संस्थांचे कर्ज व इतर सरकारी कराची देणी लक्षात घेऊन एनसीएलटी न्यायालयाने या कंपनीचा लिलाव करण्याचा आदेश दिला आहे.

पुढील महिन्यात ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. (JNRX Pharmaceutical Company Auction Orders company went bankrupt dueat sinnar to default Nashik News)

सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील एकेकाळी शान असलेली जेएनआरएक्स फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड ( प्लॉट नंबर ए-५२, एमआयडीसी, माळेगाव) या कंपनीने अल्पावधीच वेगळी ओळख निर्माण केली होती.

नंतरच्या काळात व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे या कंपनीवरील विविध वित्तीय संस्थांचे व सरकारी कार्यालयाचे देणी प्रलंबित होत गेले. यामुळे कंपनी डबघाईला आली. कुठल्याही परिस्थितीत कंपनी पूर्वपदावर येऊ शकत नसल्याने कंपनी दिवाळखोरीत गेली.\

 Court Order
Nashik: वर्ष वाया गेलेल्यांना प्रवेशासाठी अडचण! पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ABVPचे आंदोलन

याबाबत एनसीएलटी मुंबई खंडपीठाने २८ एप्रिल २०२३ ला कंपनीची अचल मालमत्ता, जमीन, बांधकाम झालेली इमारत, यंत्रसामग्री आदींचा लिलाव करण्याचा आदेश दिले आहेत.

त्यानुसार सुमारे वीस कोटींच्या जवळपास वित्तीय देणे असल्याने भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

 Court Order
Nashik Neo Metro: टायर बेस मेट्रो निओ प्रकल्पासाठी ‘तारीख पे तारीख’! नारळही न फुटल्याने मृगजळाची अनुभूती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com